वृत्त क्र. 566
निवृत्ती वेतनधारकांनो अत्यावश्यक
गरज असल्यास कोषागारासाठी घराबाहेर पडा
नांदेड दि. 23 :- जिल्ह्यात कोविड-19
संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यास
कोषागारासाठी घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका. निवृत्ती वेतनधारकांनी घरी
राहून सुरक्षित रहा, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
निवृत्ती वेतधारकांकडे प्राप्त झालेले सुधारित
निवृत्तीवेतन प्राधिकारपत्र कोषागारालाही प्राप्त होतात व त्यावर त्वरीत कार्यवाही
केली जाते. निवृत्ती वेतनधारकांनी अर्ज देण्याची आवश्यकता नाही. तसेच वयाची 80
वर्षे पूर्ण झाल्यानंतर 10 टक्के वाढ, विक्री केलेली रक्कम 15 वर्षांनी
पुन:स्थापित करण्यासाठी कोषागाराला येण्याची आवश्यकता नाही. अत्यंत अपरिहार्य
परिस्थितीत अर्ज देणे आवश्यकच असल्यास अर्ज पोस्टाने पाठवावा किंवा पेटीत टाकावा, असेही
आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment