Monday, October 3, 2016

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
आरक्षणासाठी 5 ऑक्टोंबर रोजी सोडत होणार
           नांदेड, दि. 3 :-  नांदेड जिल्‍हयातील आगामी जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्‍या प्रवर्गातुन (सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) महिलांचे आरक्षण देय जागासाठी राज्‍य निवडणूक आयेागाने ठ‍रवून दिलेल्‍या विहीत पध्‍दतीने सोडतीव्‍दारे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 पार पाडणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.   
जिल्‍हा परिषद निवडणूक विभागांच्‍या बाबतीत बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. व पंचायत समिती निर्वाचक गणांची संबंधीत तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयी बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी त‍हसिल कार्यालयामार्फत सोडतीने आरक्षण निश्‍चीत होणार आहे.  
तालुकास्‍तरीय आरक्षण सोडतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.  
अ.क्र.
जिल्‍हा परिषदचे नांव / पंचायत समितीचे नांव
सभेचा दिनांक
सभेचे ठिकाण
सभेची वेळ 
1
नांदेड जिल्‍हा परिषद
(जिल्‍हा परिषद गटासाठी
दि. 5/10/2016
बचत भवन,जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड
स. 11.00 वा. 
2
पंचायत समिती माहूर
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय माहूर
स. 11.00 वा.

3
पंचायत समिती किनवट
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट
दु. 3.00 वा.
4
पंचायत समिती हिमायतनगर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती
हिमायतनगर
स. 11.00 वा.
5
पंचायत समिती हदगाव
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह  हदगाव 
दु. 3.00 वा.

6
पंचायत समिती अर्धापूर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय अर्धापूर
स. 11.00 वा.

7
पंचायत समिती नांदेड
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, प्रशासकीय इमारत, चिखलवाडी नांदेड  
दु. 3.00 वा.
8
पंचायत समिती मुदखेड
(पंचायत समिती गणासाठी)
 
दि. 5/10/2016
 तहसिल कार्यालय मुदखेड
स. 11.00 वा.

9
पंचायत समिती भोकर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय भोकर
दु. 3.00 वा.
10
पंचायत समिती उमरी
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारत उमरी 
स. 11.000 वा.
11
पंचायत समिती धर्माबाद
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
  
नगर परिषद सभागृह धर्माबाद   
दु. 3.00 वा.
12
पंचायत समिती बिलोली
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह,बिलोली 
स. 11.00 वा.
13
पंचायत समिती नायगाव खै. (पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, नायगाव खै.
दु. 3.00 वा.
14
पंचायत समिती लोहा
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय लोहा
स. 11.00 वा.
15
पंचायत समिती कंधार
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, कंधार 
दु. 3.00 वा.
16
पंचायत समिती मुखेड
(पंचायत समिती गणासाठी)   
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, मुखेड
स. 11.00 वा. 
17
पंचायत समिती देगलूर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह देगलूर  
दु. 3.00 वा.

याबाबतचा सविस्‍तर तपशील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्‍हा परिषद, पंचायत समिती कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर लावण्‍यात आलेला आहे. ईच्‍छुकांनी या सोडतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केलेले आहे. तसेच जिल्‍हा परिषद प्रारुप निवडणूक विभाग, पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 प्रसिध्‍द झाल्‍यानंतर त्‍यावर गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती व सूचना जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्‍वीकारल्या जातील असे माहिती जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जयंती निमित्त
15 ऑक्टोंबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन
  ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 3 :-  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन, त्याअनुषंगाने इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 15 ऑक्टोंबर रोजी करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन व इतर उपक्रम आयोजित करण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी 15 ऑक्टोंबर रोजी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन व त्याअनुषंगाने इतर कार्यक्रम आयोजित करावे. या कार्यक्रमाचा अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी केले आहे.

0000000
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2016  या वर्षासाठी गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
      जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे ईएम भाग-2 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व कमीत कमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावाअसे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000
जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात 50 अर्ज दाखल
संबंधीत विभागाने त्यावर त्वरेने कार्यवाही करावी 
नांदेड दि. 3 :- जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनामध्ये  आज  विविध  शासकीय  विभागाशी  संबंधीत  50 अर्ज  दाखल  करुन  घेण्यात  आले. जिल्हाधिकारी  कार्यालय  प्रांगणातील  बचत भवनात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला.
यावेळी पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक ( पशुसंवर्धन ) पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. कोकणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनामध्ये महसूल-18, जिल्हा परिषद- 11, जिल्हा अग्रणी बँक-9, जिल्हा उपनिबंधक - 3, महानगरपालिका- 3, इतर- 6 याप्रमाणे असे एकूण 50 अर्ज  दाखल  करुन  घेण्यात  आले. नागरिकांचे  म्हणणे  ऐकूण  संबंधीत  विभागांना  त्यावर  कार्यवाही  करण्याबाबत  निर्देश  देण्यात  आले.

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...