Monday, October 3, 2016

डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जयंती निमित्त
15 ऑक्टोंबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन
  ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 3 :-  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन, त्याअनुषंगाने इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 15 ऑक्टोंबर रोजी करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन व इतर उपक्रम आयोजित करण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी 15 ऑक्टोंबर रोजी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन व त्याअनुषंगाने इतर कार्यक्रम आयोजित करावे. या कार्यक्रमाचा अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...