Tuesday, August 29, 2023

 वृत्त

 

जिल्ह्यातील इयत्ता दहावी पर्यंत शिकणारी विद्यार्थींनी

आपल्या वडिलांना पत्राद्वारे घालणार आर्त साद  

 

·  रक्षाबंधन निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

    यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

 

·  जिल्हा परिषदेचा पुढाकार

 

नांदेड (जिमाका) 29 :-  यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नकाअशी आर्त हाक देणार आहेत.  

 

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने विविध कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. तथापि जुन्या चालीरिती व कुप्रथा बाळगत अनेक पालक हे मुलींची वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आत त्यांचे बालपन व बालमन बालविवाह लावून कोमेजून टाकतात. प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपल्या मुलीच्या हिताचा दृष्टिकोन जरी असला तरी त्यांना बालविवाह लावण्याच्या विचारा पासून परावृत्त करण्यास मुलींची ही आर्त साद प्रत्येक बाबा ऐकेलअसा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.  

 

जिल्हा महिला व बालविकास विभागयुनिसेफ SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमाला आता ही एका हळव्या उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. "माझे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी माझा बालविवाह करू नकात बाबा ! मला शिक्षण घेवू द्या. मला सावित्रीची लेक बनवा आणि ज्योतिबांचा समृद्ध वारसा पुढे नेऊ द्या. माझी इच्छा पूर्ण कराल ना आई बाबा ! असे भावनिक पत्र देवून राखी पौर्णिमेची अनोखी ओवाळनी विद्यार्थींनी आपल्या आई वडिलांना मागणार आहेत.

 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बालविवाह जनजागृती संदर्भात एक अनोखा संदेश जिल्ह्यात दिला जात आहे आणि त्यासाठी पालकांचेही मुलींना सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधुन हा अभिनव उपक्रम राबविल्या जात असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगेमाध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकरजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश कांगनेजिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळनेनांदेड जिल्हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांचे या उपक्रमात विशेष योगदान लाभत आहे.

0000

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथील

पदभरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे विविध पदासाठी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पद भरतीचे आयोजन करण्यात आले होते.

संचालकव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमुंबई यांच्या सूचनेनुसार ही तासिका तत्वावरील पदभरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी यांची नोंद घ्यावीअसे आवाहन देगलूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

0000    

वृत्त             

 

कोतवाल भरती सामाजिक आरक्षण निश्चितीची सोडत 

 

नांदेड (जिमाका) 29 :- अर्धापुर तालुक्‍यातील कोतवाल संवर्गातील रिक्‍त असलेल्‍या पदांच्‍या 80 टक्‍के मर्यादेत पदे भरण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार कोतवाल भरतीच्‍या अनुषंगाने अर्धापूर तालुक्‍यातील पुढील 6 सज्‍जाचे 80 मर्यादेत कोतवाल पदे भरण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अध्‍यक्षतेखाली 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वा. तहसिल कार्यालय अर्धापुर येथे आरक्षण सोडत काढण्‍यात येणार आहे. या सोडतीसाठी  संबंधित सज्‍जातील व त्‍याअंतर्गत गावातील नागरिक, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना निमंत्रित केले आहे, असे तहसिलदार  अर्धापूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

 

पार्डी म. सज्जा अंतर्गत पार्डी म., पांगरी, चिंचबन, कारवाडी, शेनी, अहमदपूर. लोणी (बु.) सज्जाअंतर्गत लोणी (बु.), लोणी (खु.), शहापूर, लहा, लहान तांडा. मालेगाव सज्जा अंतर्गत मालेगाव, देगाव कु.धामदरी. मेंढला (बु.) मेंढला (बु.), मेंढला (खु.), वाहेदपुर, बामणी, निजामपूर. दाभड सज्जा अंतर्गत दाभड, बाबापूर, जांभरूण, येळेगाव, कलदगाव. खैरगाव (बु.) सज्जा अंतर्गत खैरगाव (बु.) खैरगाव (खु.), आमराबाद, आमराबाद तांडा या गावांचा समावेश आहे. या गावापैकी आरक्षण सोडतीनंतर आरक्षण निश्‍चीत झालेल्‍या गावात भरती प्रक्रियेची जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी निश्‍चीत केलेल्या संपुर्ण वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.

000000

वृत्त

 

नोंदणीसाठी बांधकाम कामगारांनी

खाजगी एजंटपासून सावध राहा

 

नांदेड (जिमाका) 29 :- जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी करताना मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक रुपये इतके शुल्क ऑनलाईन भरावे लागते. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामगारास लागत नाही. खाजगी एजंटपासून बांधकाम कामगारांनी सावधान रहावे. याचबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सुरक्षासंच व अत्यावश्यक संच व नोंदीत बांधकाम कामगारांना भोजन ही योजना सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याबाबत कोणत्या कामगाराकडे कोणीही त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ संबंधिताच्या विरोधात तक्रार करावीअसे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी मोहसीन सय्यद यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षाआरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी "इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ" या मंडळाची स्थापना केलेली आहे. सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयामार्फत चालविण्यात येत आहे. शासन अधिसूचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षा पासून ते 60 वर्षांच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी दर वर्षाला मागील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जातोअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी मोहसीन सय्यद यांनी कळविले आहे.

00000


 वृत्त 

उद्योगाच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता

नोंदणी मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) 29 :- उद्योगामध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉब रोलनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्याच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणा करणे शक्य होईल. या उद्देशाने उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेचे आयोजन राज्या 8 सप्टेंबर 2023 र्यंत करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9  या लिंकवर केली जाईल. जिल्हयात कार्यरत असलेल्या सर्व उद्योजकांना ही मोहिम यशस्वी करण्यासाठी गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्याच्या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वंयरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील तसेच जिल्हयामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मोठे उद्योग कार्यान्वित आहेत.

 00000

 खरीप हंगाम पिक स्पर्धेत

शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) 29 :- खरीप हंगाम सन 2023 पिक स्पर्धा कृषि विभागाकडून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या योजने बाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पिक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये 300 व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये 150 राहिल.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सात/बारा, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सात/बारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...