Tuesday, August 29, 2023

 वृत्त 

उद्योगाच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता

नोंदणी मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) 29 :- उद्योगामध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉब रोलनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्याच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणा करणे शक्य होईल. या उद्देशाने उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेचे आयोजन राज्या 8 सप्टेंबर 2023 र्यंत करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9  या लिंकवर केली जाईल. जिल्हयात कार्यरत असलेल्या सर्व उद्योजकांना ही मोहिम यशस्वी करण्यासाठी गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्याच्या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वंयरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील तसेच जिल्हयामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मोठे उद्योग कार्यान्वित आहेत.

 00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...