Tuesday, August 29, 2023

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथील

पदभरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे विविध पदासाठी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पद भरतीचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार ही तासिका तत्वावरील पदभरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन देगलूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

0000    

No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...