Saturday, June 17, 2017

जप्त रेतीसाठ्याचा दुसऱ्या फेरीचा
तहसिल कार्यालयात सोमवारी लिलाव
 नांदेड दि. 17नांदेड तालुक्यातील विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागपुर या ठिकाणचा अंदाजे 3 हजार 115 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा दुसऱ्या फेरीचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली सोमवार 19 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाण रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जुन रोजी
श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
 नांदेड दि. 17  :- आयुष संचालनालयाच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवार 21 जुन 2017 रोजी सकाळी 6.30 ते 8 या कालावधीत नांदेड शहरात मध्यवर्ती कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन यात्री निवास नांदेड येथे केले आहे. जिल्ह्यातील योगसाधक व नागरिकांनी या शिबिरात सहभाग होण्याचे आवाहन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एच. श्यामकुवर व योग समन्वय समितीचे समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील यांनी केले आहे.
याठिकाणी साधारणता 1 हजार योग साधक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहर व नांदेड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमियोपॅथिक महाविद्यालये, इतर आरोग्य विज्ञान संस्था, योग व सामाजिक संस्था यांचे संयुक्तरित्या योग प्रात्यक्षिक वर्ग घेवून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगाच्या या मध्यवर्ती कार्यक्रमास सहभागी होण्यास इच्छुक संस्था व साधकांनी योग समन्वयक समितीचे डॉ. वाय. आर. पाटील यांना भ्रमणध्वनी 9370456057, 9158885511 वर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000
जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा 
तहसिल कार्यालयात मंगळवारी लिलाव
 नांदेड दि. 17नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 19 ठिकाणचा अंदाजे 11 हजार 680 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली मंगळवार 20 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहलिस कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी नांदेड तालुक्यातील रहाटी मंडळ अंतर्गत रेती साठ्याचे ठिकाण रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...