Saturday, June 17, 2017

जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा 
तहसिल कार्यालयात मंगळवारी लिलाव
 नांदेड दि. 17नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 19 ठिकाणचा अंदाजे 11 हजार 680 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली मंगळवार 20 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहलिस कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी नांदेड तालुक्यातील रहाटी मंडळ अंतर्गत रेती साठ्याचे ठिकाण रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न     शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्...