Tuesday, February 24, 2026

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम नवी मुंबईतील खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महंत श्री शिवरुपानंद सरस्वती महाराज यांनी या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.


 

'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त, साई कालिराम जी (उल्हासनगर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्यासाठी आपण सर्व सप्रेम आमंत्रित आहात. खारघर येथील ओवे मैदानात २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होणाऱ्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहून गुरुचरणांचा आशीर्वाद घ्यावा.


 

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🚩
या मंगलप्रसंगी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (वारकरी संप्रदाय) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भक्ती आणि शक्तीच्या या अद्भूत संगमात आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.


 

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏✨
नवी मुंबईतील खारघर येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत बाबा बलविंदर सिंह जी (कार सेवावाले - गुरुद्वारा लंगर साहिब) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
📅 दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
🕗 वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत
📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.


 

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त कामोठे येथील इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मा. श्री. रामेश्वर भाऊ नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. भारताची 'विविधतेतून एकता' अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🚩✨


 

 "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनी नवी मुंबईकरांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...