Tuesday, February 24, 2026

 वृत्त क्रमांक  

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत   

नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड या कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन / ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 14 मार्च 2026 रोजी लोकअदालत आयोजीत केली आहे. 

सदरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजीत केलेल्या या लोकअदालतमध्ये वाहन चालक-मालकांनी हजर रहावे आणि तडजोड पद्धतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! नवी मुंबईच्या खारघरमध्ये आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला आपली उपस्थि...