Thursday, August 25, 2022

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 110 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, माहूर 1, हिमायतनगर 1 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 400 एवढी झाली असून यातील 1 लाख 682  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 18,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 8 असे एकूण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 458
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 95 हजार 642
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 400
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 682
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 ई-पीक पाहणीसाठी जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम

 जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

·       जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांनी माहिती नोंदवावी यासाठी ही मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- खरीप हंगाम 2022 ची पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू करण्यात आली असून यात शंभर टक्के पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. तथापि या पाहणीत शंभर टक्के पिकाची नोंदणी होण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करून मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले आहे.

 

जिल्ह्यात एकुण 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे. यात गावांची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. अर्धापूर-64, उमरी-63, कंधार 123, किनवट 176, देगलूर 109, धर्माबाद 56, नांदेड 104, नायगाव 89, बिलोली 92, भोकर 79, माहूर 83, मुखेड 135, मुदखेड 54, लोहा 126, हदगाव 135 तर हिमायतनगर तालुक्यात 68 गावे आहेत. प्रत्येक गावासाठी उद्दीष्टानुसार प्रती गाव दहा प्रमाणे एकुण 15 हजार 560 स्वयंसेवकाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक स्वयंसेवकामार्फत किमान 20 शेतकऱ्यांची नोंदणी याप्रमाणे एकुण 3 लाख 11 हजार 200 म्हणजेच 2 लाख 80 हजार 882 उद्दीष्टांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

 

सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करण्यासाठी तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, तरुण मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांची त्या-त्या गावातील पीक पेरा भरून घेण्याबाबत मदत घेतली जाईल.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...