राष्ट्रीय लोकअदालतीचे
जिल्ह्यात शनिवारी आयोजन
नांदेड दि. 6 :- महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
नांदेड यांच्यावतीने शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच
कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय
लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
दिवाणी मो. अ. दावा. , भुसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बँकाची प्रकरणे आदी न्यायालयात
प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रलंबित तडजोड
पात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
नांदेड जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ आणि विविध कंपनीचे अधिकारी, भुसंपादन अधिकारी,
मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या
संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
नांदेड यांनी केले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी
होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा,
असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000