Tuesday, May 28, 2019


उपसंचालक पदाच्या पदोन्नतीबद्दल
अनिल आलुरकर यांचा सत्कार
       
औरंगाबाद, दि. 28 :  परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांना उपसंचालक(माहिती) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा संचालक (माहिती), यशवंत भंडारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आज येथे सत्कार करण्यात आला.
            येथील संचालक (माहिती) यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती सहायक रेखा पालवे, आदींसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
           
यावेळी श्री. भंडारे यांनी श्री. आलुरकर यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, उपस्थित अधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री. आलूरकर यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन लघुलेखक यशवंत सोनकांबळे यांनी केले. श्री. आलूरकर यांची पदोन्नतीने मुंबई येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक (प्रकाशने) या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. आज औरंगाबादचे सुपुत्र आणि सध्या रायगड येथे जिल्हा माहिती अधिकारी असलेले अनिरुध्द अष्टपुत्रे यांचीही उपसंचालक (माहिती) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दलही शुभेच्छा दिल्या. श्री.अष्टपुत्रे यांची नियुक्ती कोल्हापूर येथे करण्यात आली.

*********


रास्तभाव धान्य दुकानात साखर उपलब्ध
नांदेड, दि. 28 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एप्रिल, मे व जून 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 1 हजार 970 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 143.79 , हदगाव -192.68, किनवट -370.35, भोकर-82.06, बिलोली-133.09, देगलूर-112.87, मुखेड-160.6, कंधार-64.97, लोहा-124.5, अर्धापूर-32.46, हिमायतनगर-89.12, माहूर-194.08, उमरी-65.79, धर्माबाद-65.33, नायगाव-115.25, मुदखेड-23.06 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...