Thursday, October 12, 2017

ग्रंथालयाने "वाचन प्रेरणा दिन" साजरा करावा
 - जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे  
        नांदेड, दि. 12 :- देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस जिल्हयातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांनी "वाचन प्रेरणा दिन" म्हणुन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
ग्रंथालयांनी 15 ऑक्टोंबर रोजी वाचन संस्कृती संबंधी व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, -बुक्सचे सामुहिक वाचन आदीचे आयोजन करावे. तसेच ग्रंथप्रदर्शन, निवडक कथा, कविताचे अभिवाचन करणे, निबंध स्पर्धा किंवा एखाद्या लेखकाची प्रकट मुलाखत घेणे, आवडीच्या पुस्तकावर मनोगत व्यक्त करणे, सलग काही वेळ शांतपणे वाचनाचा उपक्रम, वृत्तपत्रातील अग्रलेख किंवा प्रमुख लेखांचे वाचन  या प्रकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच "वाचन प्रेरणा दिन" कार्यक्रमाचा अहवाल जिल्हा ग्रंथालय कार्यालयास सादर करावा, असे आवाहनही जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी केले आहे.

000000
"वाचन प्रेरणा दिन"
13 ऑक्टोंबरला साजरा करावा
नांदेड, दि. 12 :-  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोंबर रोजी "वाचन प्रेरणा दिन" म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी रविवार 15 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने तो शुक्रवार 13 ऑक्टोंबर रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा यांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे. याबाबत मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक 3 ऑक्टोंबर 2017 नुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.  

000000
जागतिक अंडी दिन  
14 ऑक्टोंबरला साजरा करावा
नांदेड, दि. 12 :- कुपोषण निर्मुलनासाठी राज्यात अंगणवाडी व शाळांमधुन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी आणि अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केळी वाटप करुन 14 ऑक्टोंबरला साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक अंडी दिन कार्यक्रमात अंडयाचे आहारातील महत्व विविध कार्यक्रमातून सांगितले जाणार आहे.
पशुसंवर्धन विभाग व लोकसहभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी ऑक्टोंबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन हा सन 2016 पासून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार शाळांमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी वाटप करुन अंडयाचे आहारातील महत्व पटवुन देऊन त्यांचा दैनंदिन आहारात वापर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. शासनाच्या सुचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधीत विभाग प्रमुखांना दिले आहेत.
000000


आटीआय भोकर, हदगाव येथे
शिल्पनिदेशक पदासाठी भरती
नांदेड, दि. 12 :- आयटीआय, पदवीधारक उमेदवारांची शिल्पनिदेशक या पदावर तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावयाची आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह अर्ज प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर व हदगाव येथे सादर करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर यांनी केले आहे.   
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर येथे शिल्पनिदेशक संघाता-2 पदे, नळकारागीर, तारतंत्री, यांत्रिकी मोटार गाडी या रिक्त पदासाठी तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे शिल्पनिदेशक संघाता 2 पदे, यांत्रिकी मोटार गाडी 2 पदे, मेसन (बिल्डींग कन्स्ट्रक्शन), विजतंत्री, यांत्रिकी डिझेल हे शिल्पनिदेशकांची पदे रिक्त आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...