Friday, November 22, 2019


संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे आयोजन
टाकळी, बोंढार (नेरली) या दोन गावांची निवड  
नांदेड दि. 22 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे समतादूत प्रकल्पाच्यावतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात देगलूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत व नांदेड तालुक्यातील बोंढार (नेरली) ग्रामपंचायत या गावांची निवड करण्यात आली आहे.  
या गावात संविधान जनजागृती, स्वच्छता उपक्रम, बचतगट भेटी, महिला साक्षरता, वाचन साहित्य व संविधान प्रत यांचे वाटप इत्यादी स्वरुपात हा उपक्रम आहे. 26 नोव्हेंबर रोजी बोंढार (नेरली) येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे उद्घाटन, रॅलीचे आयोजन व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन मान्यवरांच्या उपस्थित होणार असून या राष्ट्रीय उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी समतादूत प्रकल्प बार्टी पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संविधान साक्षर ग्राममध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान साक्षर ग्राम उद्घाटन कार्यक्रम, उद्देशिका वाचन, प्रभात फेरी, अभिवादन. 27 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभियान, काव्यात्मक संविधान वाचन (प्रतीदिन वाचन करणे), 28 नोव्हेंबर सांडपाणी व्यवस्था मार्गदर्शन, 29 नोव्हेंबर बार्टी संस्थेची माहिती चालवले जाणारे विविध उपक्रमाची माहिती (ग्रामस्थ/लहान मुले), 30 नोव्हेंबर कृषी योजनाची माहिती, 1 डिसेंबर ग्रामस्थांना संविधान उद्देशिकेचा अर्थ समजावून सांगणे, 2 डिसेंबर गावातील स्मशानभूमी येथे वृक्षारोपण व स्वच्छता, 3 डिसेंबर बचतगटसंदर्भात माहिती, 4 डिसेंबर आरोग्य शिबिर, 5 डिसेंबर समाज कल्याण योजनाची माहिती, 6 डिसेंबर संविधानावर पथनाट्य, 7 डिसेंबर रोजी विधवा, परीतत्या, विकलांग महिलांसाठी असणाऱ्या योजनाची माहिती. 8 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद, 9 डिसेंबर महिला सक्षमीकरण (गावातील महिलांना मार्गदर्शन), 10 डिसेंबर विद्यार्थी चित्रकला स्पर्धा वयोगट 10-15 विषय माझे गाव, 11 डिसेंबर संविधान आधारित एक दिवसीय चर्चासत्र, कार्यशाळा, 12 डिसेंबर बाल विवाह प्रतिबंध कायदा, बाल मजूर कायदा, 13 डिसेंबर व्यसनमुक्ती कार्यक्रम, 14 व 15 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद,  16 डिसेंबर रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबीर, 17 डिसेंबर निबंध स्पर्धा वयोगट 16 ते 20 विषय संविधान, 18 डिसेंबर युवक/युवती मेळावा शैक्षणिक व रोजगार संधी, 19 डिसेंबर मानवतेची शिकवण यावर प्रबोधन कार्यक्रम. 20 डिसेंबर अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम (ग्रामस्थ/लहान मुले), 21 डिसेंबर माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती देणे, 22 डिसेंबर ग्रामस्थाशी संवाद, 23 डिसेंबर संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्य माहिती देणे, 24 डिसेंबर स्वच्छता अभियान, (संपूर्ण गाव पुन्हा ग्रामस्थाच्या मदतीने स्वच्छ करणे), 25 डिसेंबर रोजी समारोप कार्यक्रम, बक्षिस वितरण (शासकीय अधिकारी यांचे उपस्थिती) अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.
0000




शासन मान्यताप्राप्त व्यवसाय
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- शासनाची मान्यता नसताना काही संस्थांनी व्यवसाय अभ्यासक्रमाचे अवैध प्रवेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना अनेक अडचणींना समोर जावे लागले. अशा प्रकारची पुनरावृत्ती होवू नये म्हणून विद्यार्थी व पालकांनी अकरावी व बारावी व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेस महाविद्यालयास शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करुन प्रवेश घेण्यात यावा.
जिल्ह्यात क्रॉप सायन्स, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, हॉर्टीकल्चर, फ्रेश वॉटर फिश कल्चर, ॲनमल सायन्स ॲड डेअरी, ऑफीस मॅनेजमेंट, बँकिंग असे विविध व्यवसाय अभ्यासक्रम मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चालविले जाते.
शासनमान्य संस्थेची, महाविद्यालयाची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, उज्जवल गॅस एजन्सी समोर, आनंदनगर रोड नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-253366 येथे उपलब्ध होईल याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.
000000



मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड दि. 22 :- मोटार सायकलसाठी एमएच 26 बीएस ही नविन मालिका 25 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर ईमेलसह) अर्ज सोमवार 25 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.  
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मंगळवार 26 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल टेस्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


आर्थिक गणना अचूक वेळेत पूर्ण
करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 22 :- राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून राज्या26 नोव्हेंबर 2019 पासून आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रकाम सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. आर्थिक गणना अचुकपणे तसेच विहीत मुदतीमध्ये पुर्ण करण्याकरीता जिल्हयातील सर्व नागरीकांनतसेच सर्व आस्थापनांनसहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाव्दारे देशामध्ये 7 व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्याबाब निर्देश प्राप्त झाले आहेत. आर्थिक गणनेमध्ये देशामधील सर्व आर्थिक घटकांची मोजणी करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेची माहिती संकलित करणे, अहवाल जाहिर करणे, केंद्र स्तरावर निर्णय घेणे . बाबी सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. माहिती संकलनाचे काम मोठ्या स्वरुपात असल्यामुळे हे काम केंद्रशासनाने CSC e-Governance services India Ltd (CSC SPV) यासंस्थेव्दारे पुर्ण करण्याचे निश्चीत केले आहे. आर्थिक गणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम Collection of Statistical Act 2008 या कायद्याअंतर्गत प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठाने यांना प्रत्यक्ष भेट देवून यांची माहिती पेपरलेस पध्दतीने मोबाइल आज्ञावलीव्दारे संकलित करण्यात येणार आहे.
ही गणना देशामधील असंघटीत क्षेत्रातील आर्थिक घटकांची एकत्रित माहितीचा मुख्य स्त्रोत असणार आहे. आर्थिक गणनेचे माहिती संकलन ग्रामपंचायत तसेच शहरातील प्रभाग स्तरावर होणार असून माहितीचा उपयोग उद्योग, प्रामुख्याने सुक्ष्म, लघु मध्यम उद्योगांसाठी धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्यासाठी उपयोग होणार आहे. यापुर्वीवर्ष 2013 मध्ये सहावी आर्थिक गणना पुर्ण करण्यात आली होती. देशांतर्गत चालु असलेल्या आर्थिक घडामोडी, त्यांचे भौगोलिक क्षेत्र, कामगारांची संख्या वितरण, मालकीचे प्रकार, आर्थिक स्रोत . माहितीचा समोवश आर्थिक गणनेमध्ये करण्यात येणार आहे. या गणनेमध्ये पिकांचे उत्पादन, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन संरक्षण आणि बाह्य-प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी याबाबी वगळण्यात आल्या आहेत.
            नांदेड जिल्ह्याआर्थिक गणनेच्याबाबतीत CSC e-Governance services India Ltd यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष क्षेत्र कामावर नियंत्रण ठेवणे तसेच राज्यस्तर केंद्रस्तरावर समन्वय ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा सांख्यिकी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हयाआर्थिक गणनेचे काम पुर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेने ळविल्याप्रमाणे 2002 प्रगणक 1 हजार 366 पर्यवेक्षकांची आवश्यकता असून आजपर्यंत 749 प्रगणक 558 पर्यवेक्षकांची नोंदणी पुर्ण केली आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून राज्यामध्ये 26 नोव्हेंबर 2019 पासून आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रकाम सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यादृष्टीने CSC e-Governance services India Ltd या संस्थेने प्रत्यक्ष क्षेत्रकाम सुरु करण्याकरीता तयारी केलेली आहे. आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रकाम तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पुर्ण करण्याचे नियोजित आहे.
            आर्थिकगणना Collection of Statistical Act 2008 या कायद्या अंतर्गत पुर्ण करण्यात येणार असून कुटूंबाची, आस्थापनेची संपुर्ण माहिती प्रत्येकस्तरावर गोपनीय राहणार आहे. तसेच आर्थिक गणनेच्या प्रत्यक्ष क्षेत्रकामांतर्गत कुटूंबाने किंवा आस्थापनेने चुकीची माहिती किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद केलेली आहे. आर्थिक गणना अचुकपणे तसेच विहीत मुदतीमध्ये पुर्ण करण्याकरीता जिल्हयातील सर्व नागरीकांना तसेच सर्व आस्थापनांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...