Monday, November 20, 2017
आरोग्य तपासणी शिबीरात
85 रुग्णांची तपासणी
नांदेड दि. 20 :- जागतिक मधुमेह दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक
जिल्हा रुग्णालयाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय
असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे 30
वर्ष वायोगटावरील स्त्री-पुरुष व गरोदर माता यांचे आरोग्य तपासणी
करण्यात आले. या शिबिरात 85 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी 10 रुग्णास उच्च
रक्तदाब व 2 रुग्णास मधुमेह असल्याचे आढळून आले. संबंधित
रुग्णास स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवेचा लाभ
घेण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी दिला.
शिबिरास अतिरिक्त जिल्हा शल्चचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, स्त्री रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. संगेवार, वैद्यकीय अधिकारी माधुरी गडदे, तसेच कार्यालयीन
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000
श्रीक्षेत्र
माळेगाव येथे भव्य कृषि प्रदर्शन
- कृषि समिती सभापती दत्तात्रय रेड्डी
नांदेड दि.
20 :- श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेत
भव्य व अत्याधुनिक कृषि
प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी सर्व उत्पादक
कंपनी व त्यांचे प्रतिनिधी
यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात
सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना उपयुक्त
असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन
उपलब्ध करुन दयावी, असे आवाहन
जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय
रेड्डी यांनी केले.
श्रीक्षेत्र खंडोबा
माळेगाव यात्रेनिमित्ताने भव्य
कृषि प्रदर्शनाचे आयोजनासाठी
सभापती श्री. रेड्डी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बियाणे,
रासायनिक खत,औषधी,
सुधारित कृषि औजारे इत्यादी
कंपन्याच्या प्रतिनिधीची बैठक
जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात
आली होती.
बैठकीत अत्याधुनिक
कृषि प्रदर्शनाच्या ठिकाणी
शेतकऱ्यांना विविध कृषि योजना,
सुधारित कृषि तंत्रज्ञान, ठिबक व तुषार
सिंचन संचची माहिती देण्यात
येणार आहे. कृषि विज्ञान
केंद्र पोखर्णी व सगरोळीमार्फत
माती परिक्षण फिरती प्रयोग
शाळेद्वारे शेतकऱ्यांचे मातीचे
नमुने तपासण्यात येणार आहे.
प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना
विविध पिकाच्या लागवडीसंबंधी कृषि
विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडुन माहिती
देण्याचे नियोजन करण्यासाठी चर्चा
करण्यात आली. तसेच प्रदर्शनात विविध ट्रॅक्टर तसेच
ट्रॅक्टर चलीत औजारांच्या कंपनीमार्फत
स्टॉल लावण्यात येणार असून
शेतकऱ्यांना त्याव्दारे माहिती देण्यात
येणार आहे.
या प्रदर्शनात
किटकनाशक औषधी वापराबाबत शेतकऱ्यांना
सुरक्षाकीट प्रात्यक्षीक व शेतकरी
आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे
मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने एस.एस.वाय.
मार्फत माहिती देण्यात यावी
अशा सुचना दिल्या. प्रदर्शनात
फळे,
भाजीपाला व मसाला पिके
या बाबत स्पर्धा आयोजित
करण्यात आली असून प्रत्येक
नमुन्यातून तीन बक्षीसे देण्यात
येणार आहेत प्रथम बक्षीसासाठी
4 हजार रुपये, द्वितीय बक्षीसासाठी 3 हजार रुपये
व तृतीय बक्षीसासाठी 2 हजार रुपये
देण्यात येणार आहेत. तसेच
या कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या
दिवशी जिल्हा परिषदमार्फत देण्यात
येणारे कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे
वितरण करण्यात येणार आहे.
पंचायत समितीमार्फत निवड
झालेल्या शेतकऱ्यांचा सपत्नीक
सत्कार करण्यात येणार आहे.
बैठकीस कृषि
विकास अधिकारी पंडीत
मोरे, कृषि उपसंचालक
श्रीमती एम. आर.
सोनवणे, बियाणे खते
औषधी विक्रेते असोसिएशनचे दिवाकर
वैद्य, कृषि विज्ञान केंद्र
सगरोळी व पोखर्णीच शास्त्रज्ञ
डॉ. देशमुख व डॉ.
शिंदे, मोहिम अधिकारी विनायक
सरदेशपांडे, जिल्हा कृषि अधिकारी
एस. एच. कऱ्हाळे,
श्री. चंद्रवंशी तसेच बियाणे खते
औषधी व सुधारित कृषि
औजारे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित
होते.
00000
रब्बी हंगामातील
पिकांसाठी
विमा भरण्याचे
आवाहन
नांदेड दि.
20 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना
राज्यात रब्बी हंगाम सन 2017-18 मध्ये
राबविण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. कर्जदार व बिगरकर्जदार
शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची
अंतिम तारीख 1 जानेवारी 2018 ही आहे.
तसेच उन्हाळी भुईमुग पिकासाठी
अंतिम तारीख 31 मार्च 2018 आहे. अधिकच्या
माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या
तालुका कृषि अधिकारी किंवा
जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक
विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना
अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत
पिकांसाठी बंधनकारक असुन बिगर
कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक
आहे.
या योजनेअंतर्गत
वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात
येणार आहे. रब्बी हंगामातील
पिकांसाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे.
जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित
करण्यात आला आहे. पिक
पेरणीपासुन काढणीपर्यंतचा कालावधी
नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील
खंड,
किड व रोग आदी
बाबीमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी
घट काढणी पश्चात
नुकसान आदी जोखीम यामध्ये
समाविष्ट करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा, करडई, सुर्यफुल, उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी
ही योजना लागु आहे.
या योजनेंतर्गत
विमा संरक्षीत रक्कम व विमा
हप्ता पुढील प्रमाणे राहणार
आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलेाली, धर्माबाद, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, किनवट, माहूर तालुक्यातील गहु (बा) पिकासाठी विमा संरक्षीत
रक्कम हेक्टर 33 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता
495 रुपये राहील. नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड, देगलूर तालुक्यातील
ज्वारी (जि) पिकासाठी
विमा संरक्षीत रक्कम 24 हजार रुपये, पिक विमा हप्ता 360
रुपये आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, देगलूर तालुक्यातील हरभरा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 24 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता
रुपये 360 आहे. ही
योजना नॅशनल इंन्शुरन्स कंपनी
लि. मुंबई यांचेमार्फत
राबविण्यात येणार आहे.
000000
Subscribe to:
Posts (Atom)
महत्वाचे / संदर्भासाठी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...