Monday, November 20, 2017

आरोग्य तपासणी शिबीरात
85 रुग्णांची तपासणी
नांदेड दि. 20 :- जागतिक मधुमेह दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे 30 वर्ष वायोगटावरील स्त्री-पुरुष व गरोदर माता यांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. या शिबिरात 85 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी 10 रुग्णास उच्च रक्तदाब व 2 रुग्णास मधुमेह असल्याचे आढळून आले. संबंधित रुग्णास स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी दिला.
शिबिरास अतिरिक्त जिल्हा शल्चचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, स्त्री रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. संगेवार, वैद्यकीय अधिकारी माधुरी गडदे, तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...