Wednesday, September 20, 2017

प. पू. मातासाहेब देवांजी जन्म शताब्दी
सोहळा उत्साहात साजरा करावा
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 20 :- प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
मुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा मुगट येथे प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा सोमवार 2 ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत साजरा होणार आहे. याची पूर्व तयारीसाठी गुरुद्वारा मुगट येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ कारसेवावाले, मुगट येथील मातासाहेब देवांजी गुरुद्वाराचे प्रमुख श्री जत्थेदार बाबा प्रेमसिंघजी निंहगसिंघजी, नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्य व राज्याबाहेरील भाविक, भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी येतील. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवणे आवश्यक आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच 24 तास विद्युत पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपआपल्या विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाव्यात अशा सूचना करुन श्री. डोंगरे यांनी हा सोहळा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ यांनी या सोहळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने धन्यवाद मानले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या सोहळ्याच्या कालावधीत विविध विभागाने करावयाच्या कामांची माहिती दिली. दिलेल्या सूचनेनुसार संबंधीत विभागाने आपली कामे करावीत, असे सांगितले. तर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी सचखंड गुरुद्वाराच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून सर्वांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे  यांनी मुगट येथील गुरुद्वारा परिसराची पाहणी केली. याप्रसंगी महावितरण, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000
गोदावरी नदीकाठच्या गावांना
पूर परिस्थितीबाबत सतर्कतेच्या सूचना
नांदेड दि. 20 :- जायकवाडी धरणातील अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता असून या विसर्गामुळे नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. नागरीकांनी कुठल्‍याही प्रकारच्‍या अफवावर विश्‍वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मंगळवार 19 सप्टेंबर रोजी 88.10 टक्‍के क्षमतेने भरली आहे. उर्ध्‍व भागातील धरणांमध्‍ये जवळपास 100 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात केंव्‍हाही अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते आणि या विसर्गामुळे धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना आगामी काळात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. वेळोवेळी होणाऱ्या जलसाठा  विसर्गामुळे प्राधिकार क्षेत्रील नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत.  

000000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात व शहरात शनिवार 30 सप्टेंबर 2017 रोजी दसरा व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, शनिवार 30 सप्टेंबर रोजी  दसरा असल्याने जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष). एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे

00000
रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सवाची तयारी उत्साहात सुरु आहे. वडेपूरी डेरला परिसर हिरवाईने नटला आहे ( छाया :- विजय होकर्णे नांदेड )






  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...