Monday, May 10, 2021

 हरवलेली व्यक्ती आढळल्यास

नायगाव पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  तेलगंना जि. निर्मल रा. कुंटूर ह.मु.मचकल मंडळ मुधोळ येथील अर्जदार राधा शिवाजी वाघमारे वय 40 वर्ष व्यवसाय घरकाम/मजुरी यांनी दि. 7 मे 2021 रोजी येथे दिलेल्या अर्जानुसार त्यांची मुलगी नामे कार्तीका ऊर्फ कोमल शिवाजी वाघमारे वय्-40 वर्ष व्यवसाय शिक्षण  25 एप्रिल 2021 चे 8 वाजता हेडगेवार चौक नायगाव येथून कोणास काहीएक न सांगता निघून गेली आहे ती आजपावेतो घरी परत आली नाही वेगैरे मजकुराचे अर्जावरुन पो.स्टे. ला. मिसींग क्र. 10/2021 प्रमाणे नोंद घेवून पुढील चौकशी आम्ही स्वत: करीत आहोत. तरी आपले पो.स्टे. हादीत ताबे पोलीस मार्फत या मुलाचा शोध होवून तो मिळून आल्यास  पोलीस स्टेशन नायगावला कळवावे. 

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन- रंग-गोरा, उंची-5 फुट, वय-20 वर्षे, अंगावर कपडे-पिवळया रंगाचा पंजाबी ड्रेस , बाधा- मजबुत, आवगत भाषा- मराठी, हिंदी, तेलगु  पोलीस स्टेशन नायगाव -02465262133 व चौकशी अंमलदार-7875643333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोना/349 पो. स्टे. नायगाव, एस.एन. सांगवीकर यांनी केले आहे.

                    0000

 हरवलेली व्यक्ती आढळल्यास

नायगाव पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  तेलगंना जि. निर्मल रा. कुंटूर ह.मु.मचकल मंडळ मुधोळ येथील अर्जदार राधा शिवाजी वाघमारे वय 40 वर्ष व्यवसाय घरकाम/मजुरी यांनी दि. 7 मे 2021 रोजी येथे दिलेल्या अर्जानुसार त्यांची मुलगी नामे कार्तीका ऊर्फ कोमल शिवाजी वाघमारे वय्-40 वर्ष व्यवसाय शिक्षण  25 एप्रिल 2021 चे 8 वाजता हेडगेवार चौक नायगाव येथून कोणास काहीएक न सांगता निघून गेली आहे ती आजपावेतो घरी परत आली नाही वेगैरे मजकुराचे अर्जावरुन पो.स्टे. ला. मिसींग क्र. 10/2021 प्रमाणे नोंद घेवून पुढील चौकशी आम्ही स्वत: करीत आहोत. तरी आपले पो.स्टे. हादीत ताबे पोलीस मार्फत या मुलाचा शोध होवून तो मिळून आल्यास  पोलीस स्टेशन नायगावला कळवावे. 

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन- रंग-गोरा, उंची-5 फुट, वय-20 वर्षे, अंगावर कपडे-पिवळया रंगाचा पंजाबी ड्रेस , बाधा- मजबुत, आवगत भाषा- मराठी, हिंदी, तेलगु  पोलीस स्टेशन नायगाव -02465262133 व चौकशी अंमलदार-7875643333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोना/349 पो. स्टे. नायगाव, एस.एन. सांगवीकर यांनी केले आहे.

                    0000

 

अनाथ बालकांसाठी महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या

 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  जिल्ह्यात कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि अशा बालकांना कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील, तर अशा बालकांसाठी  सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान 8308992222 7400015518 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे, आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश फेसबुक व्हॉटसॲप वर फिरत आहेत. परंतु हे मेसेजेस चुकीचे आहेत. अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशीर आहे. महिला बाल विकास आयुक्तालय आणि Save The Children (India) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षात संपर्क करण्यासाठीचे हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत.  तसेच बालकासाठी यापुर्वी सुरु असलेली हेल्पलाईनही उपलब्ध आहे.

0000

 538  कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 294 व्यक्ती कोरोना बाधित

 12 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1  हजार 936 अहवालापैकी 294 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 273 तर अँटिजेन तपासणीद्वारे 21 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 85  हजार 225 एवढी झाली असून यातील 78  हजार  197  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  5  हजार  18 रुग्ण उपचार घेत असून 183 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 8 ते 10 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 12  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 727 एवढी झाली आहे. दिनांक 8 मे रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे रामनगर मुखेड येथील 46 वर्षाची महिला, डेल्टा कोविड रुगणालय येथे किनवट तालुक्यातील कुपटी येथील 42 वर्षाचा पुरुष, दि. 9 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे किनवट तालुक्यातील कोठारी येथील 59 वर्षाचा पुरुष, बिलोली येथील 73 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे शक्ती नगर बारड येथील 50 वर्षाचा पुरुष, हनुमान नगर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, यशश्री कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील दोसनी येथील 52 वर्षाचा पुरुष, ओ कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर बोरगडी तांडा येथील 55 वर्षाचा पुरुष, यशोसाई रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील वाझा बु. येथील 50 वर्षाचा पुरुष,  दि. 10 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 75 वर्षाची महिला, विष्णुनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला गुरुजी कोविड रुगणालय येथे आशिष नगर नांदेड येथील 55 वर्षाच्या पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 92, बिलोली 6, कंधार 14,मुदखेड 2, धर्माबाद 9, परभणी 6, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 10, किनवट 16, मुखेड 14, यवतमाळ 3, अर्धापूर 12, हदगाव 15, लोहा 16, नायगाव 14, हिंगोली 6, भोकर 7, हिमायतनगर 6, माहूर 10, उमरी 1, आदिलाबाद 2 असे एकूण 273 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 4, देगलूर 4, मुखेड 4, नांदेड ग्रामीण 3 हिमायतनगर 1, अर्धापूर 1, कंधार 1, बिलोली 1, किनवट 2 असे  एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 21 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 538 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 255, धमार्बाद तालुक्यातंर्गत 8, देगलूर कोविड रुग्णालय 2, अर्धापूर तालुक्यातंर्गत 26, उमरी तालुक्यातंर्गत 4, खाजगी रुग्णालय 87, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 14, मुखेड कोविड रुग्णालय 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड रुग्णालय 13, कंधार तालुक्यातर्गंत 13, बिलोली तालुक्यातर्गंत 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 1 , बारड कोविड केअर सेटर 3 , माहूर तालुक्यातर्गंत 11 , हदगाव कोविड रुगणालय 24, लोहा तालुक्यातर्गत 10 , मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1, असे 538 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .    

आज 5 हजार 18 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 149, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 104, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 35, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 70, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, देगलूर कोविड रुग्णालय 20, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 21, बिलोली कोविड केअर सेंटर 100, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 23, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 34, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36 , मुदखेड कोविड केअर सेंटर 16, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 27, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17, एनआरआय कोविड केअर सेंटर 48, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 384 नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 701, खाजगी रुग्णालय 990, असे एकूण 5 हजार 18 उपचार घेत आहेत.  

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 49, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 54, भक्ती जम्बो कोविड केअर सेटर 29  खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 85 हजार 920

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 90 हजार 649

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 85 हजार 255

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 78  हजार 197

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 727

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-31

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-264

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 18

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-183

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...