Wednesday, September 20, 2023

कोतवाल पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महसूल विभागातील कोतवाल पदभरती परीक्षा-2023  रविवार 24 सप्टेंबर 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील 16  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.


जिल्ह्यातील विविध 16 केंद्रावर दुपारी 2 ते दुपारी 3 या कालावधीत परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 वृत्त

 नीट, जेईई, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी

पात्र विद्यार्थ्यांना टॅब व सिमकार्डचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  सन 2023-24 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या व ऑनलाईन अर्ज केलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गातील पात्र विद्यार्थ्याना जेईई/ नीट/एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेल्या 75 टॅबचे वितरण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 


यावेळी समाज कल्याण अधिकारी बापू दासरीविद्यानिकेतन कमळेवाडीचे शिक्षक शिवाजी अंबुलगेकरश्रीमती मादसवार व श्रीमती केंद्रे यांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी छत्रपती शाहू महाराजमहात्मा ज्योतीबा फुले, डॉबाबासाहेब आंबेडकरसावित्रीबाई फुले या थोर महापुरुषांना अभिवादन केले.  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गातील विद्यार्थ्याना टॅब बाबत मार्गदर्शन केलेतसेच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आकाश पोपळघट या विद्यार्थ्याच्या कार्याची दखल बाहेर देशांनी घेतल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेविद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द निर्माण झाल्यास उपस्थित विदयार्थ्यामधून व विद्यार्थीनमधून सुध्दा आपल्या जिल्हयातील विद्यार्थी आकाश पोपळघट व कल्पना चावला होऊ शकतात व आपल्या देशाची मान उंचाऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

समाजकल्याण अधिकारी बापू दासरी व विद्यानिकेतन कमळेवाडी सहशिक्षक शिवाजीराव अंबुलगेकर यांनीही विद्यार्थ्यांना टॅबचे महत्व सांगितलेसहशिक्षक अंबुलगेकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयीचे महत्व सांगून थोर पुरुशांनी केलेल्या कार्यास उजाळा दिलाकार्यक्रमाचे सुत्र संचलन पांपटवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावित श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले.

00000



 वृत्त 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 

·    शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने महाविद्यालयांना विविध सूचना  

 

नांदेड (जिमाका) 20 :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2021-22  2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु केंद्र शासनाच्या सुधारित निधी वाटपाच्या निर्णयानुसार शासन स्तरावर उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने तसेच काही तांत्रिक कारणास्तव सन 2021-22  2022-23 या शैक्षणिक वर्षाची काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यास विलंब होत आहे व याच कारणास्तव काही महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे रोखून धरत असल्याबाबत विद्यार्थी संघटनेकडून निवेदन प्राप्त होत आहेत.

 

या अनुषंगाने बैठकीत पुढील विषयाबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय परिपत्रक 6 सप्टेंबर 2023 नुसार शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणाखाली मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे अडवणूक करण्यात येऊ नयेत त्यांना तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावे. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे शैक्षणिक कागदपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेले समान संधी केंद्र व्यवस्थित चालू ठेऊन त्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडचणी महाविद्यालय स्तरावर सोडविण्यात याव्या. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करतात त्यांची उपस्थिती देताना सदरचा विद्यार्थी नियमित महाविद्यालयात उपस्थित राहतो का याची खात्री करून विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात यावे. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यवाही करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यादी तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरूवार 19 ऑक्टोंबर 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त 

अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती

उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज 10 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर व तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि. एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

जिल्हास्तर क्रीडा महोत्सवास भरभरुन प्रतिसाद  

 

नांदेड (जिमाका) 20 :- जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉलबॅडमिंटन व टेबलटेनिस स्पर्धेचे आयोजन 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. एस. आय. वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता निळकंठ गव्हाणेसेवानिवृत्त आर.एस.आय. सय्यद जमीलक्रीडा अधिकारी संजय बेतीवारप्रवीण कोंडेकरराज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकरचंद्रप्रकाश होनवडजकर आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम त्याचदिवशी 17 सप्टेंबर रोजी सायं 7.30 वा. संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणुन अधिष्ठाता डॉ. एस. आय. वाकोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामीण पोलिस स्टेशन सिडको-नांदेडचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावारशिवछत्रपती पुरस्कारार्थी सुरज सोनकांबळेआंतरराष्ट्रीय दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू कु.लता उमरेकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपशिक्षणाधिकारी कृष्णा फटाले, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. महेश वाखरडकरडॉ. अश्विन बोरीकरबास्केटबॉल असोसिएशन सचिव विनोद गोस्वामी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसकरचंद्रप्रकाश होनवडजकर आदि मान्यवर उपस्थित होते.

 

क्रीडा महोत्सव स्पर्धेचा अंतिम निकाल  

बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत पुरुष खुला गट प्रथम – बॉलर्स बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- नेक्सस बास्केटबॉल क्लब नांदेडतृतीय- बिलीव्हर्स बास्केटबॉल क्लब नांदेड यांना प्रथम 15 रुपये, द्वितीय-12 हजार 500 रुपये व तृतीय 11 रुपये रोख रक्कममेडलट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

महिला खुला गट प्रथम – मस्तानपुरा बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- बॉलर्स  बास्केटबॉल क्लब नांदेडतृतीय- एसजीजीएस बास्केटबॉल क्लब नांदेड यांना प्रथम  10 हजार रुपये, द्वितीय-7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये रोख रक्कममेडलट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

 

17 वर्षे मुले गट प्रथम – राज अकॅडमी नागार्जुना बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- ज्ञानमाता विद्या मंदीरनांदेडतृतीय- जिल्हा क्रीडा प्रशिक्षण बास्केटबॉल केंद्रनांदेड यांना प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय-7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये रोख रक्कममेडलट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तसेच

 

टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते

पुरुष खुला गट एकेरी प्रथम – प्रणव सुदर्शन अडबलवारद्वितीय अमिष आनंद आठवलेतृतीय- आयुष अश्विन बोरीकरतसेच महिला एकेरी गटात प्रथम ऋतुजा बालाजी पेरकेद्वितीय- श्रृध्दा सुभाष रावणगावकरतृतीय- शरयु निलेश देशमुख व मिक्स दुहेरी मध्ये प्रथम– आयुष अश्विन बोरीकर व सत्यम बालाजी पेरकेद्वितीय- प्रणव सुदर्शन अडबलवार- इषिका अश्विन बोरीकरतृतीय- ऋतुजा बालाजी पेरके- रिया मधुकर अनलदास यांना अनुक्रमे प्रथम रु 5 हजार रुपये,  द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये रोख रक्कममेडलट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर 11 वर्षाखालील मुले प्रथम श्रेयष कदमसक्षम आठवलेऋतीक कनकावार13 वर्षाखालील मुले प्रथम अर्णव ठोकेद्वितीय- निरज नांदेडेतृतीय तेजस ठोके15 वर्षाखालील मुले- प्रथम -राज एंगडेद्वितीय गौरव इरमलवारतृतीय वरद शिवनगावकर यांना वितरीत करण्यात आला.

 

बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते

पुरुष खुला गट एकेरी प्रथम – चेतन उध्दवराव मानेद्वितीय- परिक्षीत सोनलकुमार पतंगरायतृतीय- संतोष स्वामीतसेच महिला एकेरी गटात प्रथम- साक्षी रामदास इंदुरेद्वितीय- सई तुकाराम मानेतृतीय- शरवरी शंकरराव वडवळेव पुरुष मिक्स दुहेरी मध्ये प्रथम – मोहन बाळासाहेब भोसले- संदिप राजाराम उल्लेवारद्वितीय – श्रीनिवास भुसेवार- संदिपसिंग जोहरतृतीय- संतोष नागनाथ स्वामी- संतोष पुलगमवार यांना अनुक्रमे प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय हजार रुपये रोख रक्कममेडलट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रोत्साहन म्हणुन सखाराम रामजी वाकोडेसय्यद जमील व खुशी गव्हाणे आदीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात देगलूरनायगावधर्माबादअर्धापूरकिनवटबिलोलीमुदखेडलोहा व इतर तालुक्यातील अंदाजे 600 ते 650  स्पर्धक सहभागी झाले होते. याकरीता पंच म्हणुन बास्केटबॉल.विनोद गोस्वामी व विष्णु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास कांबळेविकास मेहरकरसोहम सोनकांबळेजयपाल गजभारेसुनील भालेरावनागसेन वाढवेमहमद अनवरप्रदीप गायंकाआदिती जाधवबॅडमिंटन करीता डॉ. महेश वाखरडकरविक्रम शेखसंतोष भवनगीकरअभिजीत संजयकुमारसृष्टी रावनगावकरटेबल टेनिस करीता हनमंत नरवाडेश्रीकांत दुधारेआनंद नरवाडेप्रणव अडबलवारसत्यम पेरक आदीन काम पाहिले.

 

उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी केले तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी व सृष्टी रावनगावकर यांनी केले तर आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर यांनी मानले.

 

जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवारप्रवीण कोंडेकरराज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकरचंद्रप्रकाश होनवडजकरवरिष्ठ लिपीक संतोष कनकावारसंजय चव्हाणआनंद जोंधळेहनमंत नरवाडेआकाश भोरे तर कार्यालयातील मोहन पवारसुभाष धोंगडेचंद्रकांत गव्हाणेविद्यानंद भालेरावज्ञानेश्वर रोठेसोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.  

0000

जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या परिक्षेसाठी

अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाही सुरू

 

नांदेड (जिमाका) 19 :- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18 संवर्गातील परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी 5 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. या संकेतस्थळाची लिंक जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी https://maharddzp.com या संकेतस्थळावरील लिंक बँक खात्याचा अचूक तपशील काळजीपूर्वक नोंदवावा,  जेणेकरून संपूर्ण रक्कम प्रदान करण्याची कार्यवाही करणे सोईची होईल, असे आवाहन जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

 

मार्च 2019 व ऑगस्ट 2019 अंतर्गत (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत निर्णय 21 ऑक्टोंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या परीक्षा शुल्कापोटी भरणा केलेली रक्कम परत प्राप्त होण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर जावून आपल्या बँक खात्याचा अचूक तपशील काळजीपूर्वक नोंदवावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषेदच्यावतीने करण्यात आले आहे.  

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...