Wednesday, January 22, 2020


अनुसुचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी
विशेष घटक योजना, बीजभांडवल योजना
नांदेड, दि. 22  :- राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित) यांच्याकडून पुढील योजनेंतर्गत ऑनलाईन कर्जासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50  हजार रुपयापर्यंत प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार अनुदान देण्यात येते. राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँकेच्या कर्जावर नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षात करावयाची आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार 1 ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. प्रकल्प त्यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के त्यामध्ये 10 हजार रुपये अनुदान व उर्वरित कर्ज 4 टक्के व्याजाने तसेच बँकेचा सहभाग 75 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के याप्रमाणे कर्ज दिले जाते. या कर्ज योजनेंतर्गत कर्ज मागणीसाठी लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्राच्या स्वंय साक्षांकित प्रतीसह कर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावेत. सॉफ्ट कॉपी कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात दाखल करावी.
सोमवार 20 जानेवारी 2020 पासून ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येईल. महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/sca.mm या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. सन 2019-20 या वर्षासाठीचे अर्ज त्याच आर्थीक वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येतील. यापुर्वी केलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराने वैयक्तिक माहितीच्या कागदपत्राच्या प्रती अपलोड कराव्यात. व्यवसायिक माहितीचे तसेच साक्षीदार, जामीनदार यांच्या कागदपत्राच्या स्वंय साक्षांकित करुन जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात सक्षम येऊन दाखल कराव्यात. अर्जदाराने कोणत्याही गैर व अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क करुन नये. अडचणीबाबत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विहित नमुना तसेच आवश्यक कागदपत्राची सूची इत्यादी तपशील पाहण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस. एस. भोसले यांनी दिली आहे.
0000

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश
नांदेड, दि. 22  :- अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2020-2021 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 ते 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अभिनव गोयल प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या पुढील प्रमाणे निवासी शाळेत सन 2020-21 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकाकडून इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी. शासकीय इंग्रजी माध्यम निवासी शाळा सारखणी व दुधड येथे प्रवेश इयत्ता पहिलीसाठी. एकलव्य रेसिडेंसियल स्कुल सहस्त्रकुंड येथे प्रवेश इयत्ता पहिलीसाठी शनिवार 1 फेब्रुवारी 2020 पासून विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट येथे माहिती सेतु सुविधा केंद्र येथुन प्राप्त करुन घ्यावे.
अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडून मंजुरात दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच प्रवेश देण्यात येईल.
अटी व शर्ती या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे नाव सक्षम अधिकाऱ्यांने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्रय रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख इतके राहील. तहसिलदार यांचे चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे. इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट छायाचित्र व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा.
विद्यार्थ्यांचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी तालुका किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे असावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्ररेषेखालील अनुसुचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन दयावे लागेल. विद्यार्थ्यांना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे.  
या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000

संमतीने जमीन वाटप (पोट हिस्सा) करणे आता झाले सोपे
नांदेड, दि. 22  :- सात/बारा वरील सर्व धारकांची संमती असल्यास भुमि अभिलेख विभाग सर्व धारकांनी संमती दिल्याप्रमाणे नकाशा तयार करुन देणार आहे.
जामाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख पुणे यांच्या परिपत्रकानुसार सर्व संमतीने पोट हिस्सा नकाशा स्वतंत्र 7/12 करता येणार आहे. या पुर्वी पोट हिस्सा करण्यासाठी अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जागेवर जावुन मोजणी करुन पोट हिस्सा नकाशा तयार केला जात असे. आता मात्र सर्व सहधारकानी संमतीने पोटहिस्सा अर्ज केल्यास मुळ अभिलेखाची खात्री करुन सर्व सहधारकांची संमतीने दाखल केलेल्या नकाशा 7/12 वरील क्षेत्राप्रमाणे कार्यालयात पोट हिस्सा नकाशा तयार करता येणार आहे.
त्या कामी अर्जदार यांना पुढील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक आहे. पोटहिस्सा मोजणी करण्यासाठी सर्व सहधारकाची स्वाक्षरी असलेला असलेला अर्ज मोजणीव्दारे ऑनलाईन भरुन घेतला जाणार.या अर्जावर साधी मोजणी फी आकारणी केली जाईल. एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी / संमती नसल्यास पोटहिस्सा करता येणार नाही. गट नंबर /  सर्व्हे नंबरचे सर्व 7/12 (तिन महाचे आतील.) धारण जमिनी मध्ये कसे पोटविभाग करवयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांच्या  स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा, तसेच  7/12 वेगळा झाला असल्यास गाव नमुना 6   मधील कच्चा नकाशा. या नकाशा प्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जे वहिवाटीत असलेले अंदजित क्षेत्र अधिकार अभिलेखत असलेल्या क्षेत्राचा तपशील, तसेच सामायिक क्षेत्रात विहीर, बोअरवेल, वस्ती झाडे यांचा तपशील देणे आवश्यक आहे. भोगवटादार यांनी ओळख पटवण्यासाठि फोटो ओळखपत्राची स्वसांक्षांकित छायाप्रत देणे आवश्यक आहे सदरचे ओळख पत्र हे सरकारने दिलेले अधिकृत फोटो ओळख पत्र असणे आवश्यक आहे.
याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यास  उपअधिक्षक भुमि अभिलेख यांच्या कडुन सर्व सहधारकांना  नोटिस दिली जाईल. कच्चा नकाशा आणि क्षेत्राचा तपशील सर्व सहधारक यांना मान्य असल्यास जबाब उप अधिक्षक भुमि अभिलेख यांच्या समोर इन कॅमेरा नोंदवला जाईल. जबाब घेताना अधिकारी आणि सर्व सहधारकांचा एकत्रीत फोटो मोबाईल किंवा अन्य कॅमे-याव्दारे घेतला जाऊन, त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया पुर्ण केली जाईल. चौकशीची गरज नसल्यास सात दिवसात कार्यवाही होईल. संमतने पोटहिश्याची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तो लागु झाल्यानंतर संबधीत धारकास आवश्यक वाटल्यास  त्यांचे पोटहिस्साची हद्द कायम करण्या साठी कार्यालयाकडे स्वतंत्र मोजणी अर्ज करता येईल.
सात/बारा प्रमाणे स्वतंत्र नकाशा करुन घेणे साठी सहधारकांनी संमतीने पोटहिस्सा साठी आपल्या तालुक्यातील उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयास संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख नांदेड यांनी केले आहे.      
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...