Wednesday, January 22, 2020


भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये
अधिकारी पदासाठी पूर्व  प्रशिक्षण
नांदेड, दि. 22 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी  बुधवार 12 ते शुक्रवार 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 52 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची  निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड  येथे गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी मुलाखतीस  उपस्थित  रहावे. मुलाखतीस येतांना फेसबुक पेज वर  Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर   सर्च  करुन त्यामधील एसएसबी-52 कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या  प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पुर्ण भरुन सोबत घेऊन यावी.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन ( CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी            एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्श बोर्ड मुलाखतीसाठी        पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा  'B'   ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एसएसबीसाठी ‍ ‍शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry‍ Scheme साठी  एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठीशिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...