Sunday, August 11, 2024

   वृत्त क्र.  695

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर

नांदेड, दि.११ ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.५.१५ मिनिटांनी ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील

***

  वृत्त क्र.  694

नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

महसूल पंधरवडा- आपत्ती बाबत जनजागृती करीता ज‍िल्‍हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

नांदेड दि. 11 ऑगस्‍ट : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय, नांदेड व महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्यवस्थापन प्राध‍िकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-Run For Safety या उपक्रमांतर्गत नांदेड येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. 

या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी सहभागी स्‍पर्धक - युवक युवतीना आपत्‍तीमध्‍ये बचाव कसा करावा बाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला ह‍िरवा झेंडा दाखवून ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड येथून स्पर्धेची सुरुवात केली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. श‍िवाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्‍हीआयपी रोड मार्गे ज‍िल्‍हा क्रिडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज‍िल्‍हयातील एन.एस.एस.,एन.सी.सी., स्‍काऊट व गाईड, होमगार्ड, व‍िवि‍ध र्स्‍पोर्ट अॅकडमी, आपदा मित्र, महसूल व‍िभागाचे अध‍िकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीन‍िकेतन वि‍द्यालय, एन.एस.बी. कॉलेज, सायन्‍स कॉलेज, प‍िपल्‍स कॉलेज, यशवंत कॉलेज, आय. टी. एम. कॉलेज, जवाहर महाव‍िदयालय,वसंतराव नाईक कॉलेज, म.फुले कॉलेज मुखेड सह नायगांव, अर्धापुर सह ज‍िल्‍हयातील शाळा कॉलेजच्‍या व‍िदयार्थ्‍याने मोठया उत्‍साहात सहभाग घेतला होता. 

या मॅरेथॉन मध्‍ये मुलीमध्‍ये प्रथम तेजस्‍वीनी संघरत्‍न कांबळे, द्वितीय आर्या भगवान दुथडे, तृतीय रंजना रमेश यादव व मुलामध्‍ये प्रथम र‍ितेश साहेबराव टोमके, द्वि‍तीय परमेश्‍वर सुर्यकांत रामापुरे, तृतीय लक्ष्‍मण दत्‍ता राठोड व‍िजेते ठरले. सायन्‍स कॉलेल व एन.एस.बी.कॉलेजच्‍या व‍िदयार्थानी चांगली कामगीरी केली.

ही मॅरेथॉन यशस्‍वी करण्‍यासाठी अभ‍िजीत राऊत मा.ज‍िल्‍हाध‍िकारी तथा अध्‍यक्ष ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वडदकर न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी, किशोर कुऱ्हे, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन अध‍िकारी यांच्‍या न‍ियोजनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभागाचे महसूल सहायक बारकुजी मोरे यांनी सर्व व‍िभागाशी समनव्‍य ठेवून मॅरेथॉन यश्‍स्‍वी करण्‍याचा प्रयत्‍न केला. ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी, जयकुमार टेंभरे यांच्‍यासह ज‍िल्‍हा क्रीडा अध‍िकारी कार्यालयाचे अध‍िकारी, कर्मचारी, कोच व गणेश मुंढे -चौरंग मार्फत मॅरेथॉन स्‍पर्धेचे परीक्षण केले. यावेळी मल्‍लि‍कार्जुन करजगी- संचालक एन.एस.एस. स्‍वामी रामानंद ति‍र्थ मराठवाडा व‍ि‍द्यापीठ, एस.डी.आर.एफ. चे पोलीस निरीक्षक पी.एस. रुपदास सोनवणे, होमगार्डचे वरीष्‍ठ पलटन नायक शेख बसीरोद्दीन, बळवंत आटकोरे, शंकपाळे, आदीसह व‍िव‍िध शाळा महाविदयालय,एन.एस.एस,एन.सी.सी.,स्‍काऊट गाईड,होमगार्ड,एस.डी.आ.एफ.आपदा मित्र संबंधीत अध‍िकारी, कर्मचारी , प्राध्‍यापक, श‍िक्षक व कोच यांची उपस्‍थ‍िती होती.

000




  वृत्त क्र.  693

 20 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून जमा होणार रक्कम 

 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 119 कोटी जमा 

नांदेड दि. १० ऑगस्ट : प्रधानमंत्री पिक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 20 ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत 119 कोटी जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी 20 ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे .त्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई वितरित केली जात आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार विमा कंपन्यांनी कारवाई सुरू केली आहे. 2लक्ष 54 हजार 333 शेतकरी नुकसान भरपाई साठी विमा कंपनीकडून लाभार्थी ठरले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 178.61 कोटी रुपये मंजूर झाले आहे. 20 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम मिळावी असे निर्देशित करण्यात आले आहे.

10 ऑगस्टपर्यंत 1 लक्ष 41 हजार 575 शेतकऱ्यांच्या खात्यावर 119.2 कोटी रक्कम जमा झाली आहे. शेतकऱ्यांनी आपले खाते तपासून घ्यावे. जर विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसेल तर मात्र 20 ऑगस्टपर्यंत वाट बघावी. 20 ऑगस्टपर्यंत ही विम्याची रक्कम खात्यावर जमा नसेल झाली तर विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...