Monday, May 18, 2020


अन्न व्यावसायिकांनी वेळेच्या बंधनासहित
आरोग्याच्यादृष्टिने उपाययोजना कराव्यात ;
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन  
नांदेड, दि. 18 :-  अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारीत वेळेच्या बंधनासहीत आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावयाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिताचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असा मानण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी कळविले आहे.  
नांदेड जिल्हयातील सर्व घाऊक व किरकोळ किराणा आस्थापना कंटेनमेंट झोन वगळता यांच्या व्यावसायाची वेळ दररोज (रविवार वगळून) सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आलेली असुन अन्न व्यावसायिकांनी निर्देशित वेळेमध्ये आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित केले आहेत.
            अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वतःचे व कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील या दृष्टीने दक्षता घ्यावयाची असुन, चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाचे जागेत कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मिटरचे राहील याबाबत दक्षता घ्यावयाची असुन, व्यवसायाच्या परिसरात एका वेळी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वतः उपाययोजना करुन, त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच ग्राहकांचे (सो / फिजीकल डिस्टन्स) बाबतीत योग्य अंतर ठेवायचे असुन, अन्न हातळण्यापुर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे, किंवा हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. तसेच चेह-यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करता येणार नाही, याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे. तसेच ग्राहकाकडून खरेदी नंतर पैसांची देवाण-घेवाण आर.बी.आय.च्या सुचनेनुसार ई-वलेटस् व स्वाई शीनद्वारे करण्यावर भर द्यावा.
अन्न व्यावसायिकांना असेही सुचित  करण्यात येते की,  सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने त्यांनी स्वतःची व कामगारांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून स्क्रीनींक टेस्ट करुन घ्यावी तसेच घाऊक किराणा व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा तपशिल व्यवस्थीत जतन करुन ठेवावा व कोणत्याही प्रकारे साठेबाजी व काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
00000


कोरोना : आतापर्यंत 2 हजार 420 नमुने निगेटिव्ह  
तर 182 अहवाल प्रलंबित ; 97 रुग्ण पॉझिटिव्ह ;  
कोरोना मुक्त एकुण 30 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी
नांदेड, दि. 18 :- कोरोना विषाणु संदर्भात सोमवार 18 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 19 हजार 611 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकुण 2 हजार 702 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 420 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 182 चा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 97 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 30 रुग्णांना कोरोना या आजारापासून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
उपचार सुरु असलेल्या 60 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 48 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
            आत्तापर्यंत एकूण संशयित – 2581, एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2350, क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1009, अजून निरीक्षणाखाली असलेले – 196, पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -59, घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2291, एकुण नमुने तपासणी- 2702, एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 97, पैकी निगेटीव्ह – 2302, नमुने तपासणी अहवाल बाकी- 182, नाकारण्यात आलेले नमुने - 14
अनिर्णित अहवाल – 104, कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5, जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 19 हजार 611 यांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
000000


नवीन वाहनाची नोंदणी वाहन वितरकाच्या आवारात
वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी करु नये
नांदेड, दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त नवीन वाहन नोंदणीचे खटला विभागातील शासकीय दंड कर स्विकारण्याचे कामकाज सुरु राहील. नव नोंदणीचे कामकाज हे वाहन वितरकाच्या आवारात होणार असल्याने वाहनधारकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश 17 मे 2020 अन्वये प्रादेशिक परिवहन कार्यालयात 10 टक्के लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सोमवार 18 मे 2020 पासून सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी नमूद केले आहे.
00000



नांदेड जिल्ह्यात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू 
नांदेड, दि. 18 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश रविवार 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
            राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून लॉकडाऊनचा कालावधी रविवार 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश 17 मे ते 31 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात नमूद नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश, शुद्धीपत्रक, सुधारीत आदेशानुसार निर्गत निर्दश, अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यांनी नमूद नियमांची अंमलबजावणी, काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातून करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच नमूद आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश 17 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...