Monday, May 18, 2020


अन्न व्यावसायिकांनी वेळेच्या बंधनासहित
आरोग्याच्यादृष्टिने उपाययोजना कराव्यात ;
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन  
नांदेड, दि. 18 :-  अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारीत वेळेच्या बंधनासहीत आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावयाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिताचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असा मानण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी कळविले आहे.  
नांदेड जिल्हयातील सर्व घाऊक व किरकोळ किराणा आस्थापना कंटेनमेंट झोन वगळता यांच्या व्यावसायाची वेळ दररोज (रविवार वगळून) सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आलेली असुन अन्न व्यावसायिकांनी निर्देशित वेळेमध्ये आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित केले आहेत.
            अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वतःचे व कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील या दृष्टीने दक्षता घ्यावयाची असुन, चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाचे जागेत कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मिटरचे राहील याबाबत दक्षता घ्यावयाची असुन, व्यवसायाच्या परिसरात एका वेळी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वतः उपाययोजना करुन, त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. तसेच ग्राहकांचे (सो / फिजीकल डिस्टन्स) बाबतीत योग्य अंतर ठेवायचे असुन, अन्न हातळण्यापुर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे, किंवा हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. तसेच चेह-यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करता येणार नाही, याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे. तसेच ग्राहकाकडून खरेदी नंतर पैसांची देवाण-घेवाण आर.बी.आय.च्या सुचनेनुसार ई-वलेटस् व स्वाई शीनद्वारे करण्यावर भर द्यावा.
अन्न व्यावसायिकांना असेही सुचित  करण्यात येते की,  सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने त्यांनी स्वतःची व कामगारांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून स्क्रीनींक टेस्ट करुन घ्यावी तसेच घाऊक किराणा व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा तपशिल व्यवस्थीत जतन करुन ठेवावा व कोणत्याही प्रकारे साठेबाजी व काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...