Tuesday, May 19, 2020


करबला भागात नवीन एक कोरोना रुग्ण
आतापर्यंत 2 हजार 441 अहवाल निगेटिव्ह ;
एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू    
नांदेड, दि. 19 :- शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 22 हजार 57 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 730 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 441 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू आहे. या घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 98 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...