Tuesday, February 6, 2024

 वृत्त क्रमांक 110 

सीसीआय मार्फत जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू

 

·     भोकर केंद्रावर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण 5 कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरीक्त सी.सी.आय.मार्फत नांदेड जिल्ह्यात भोकर या 1 केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. कापूस पणन महासंघाच्या नांदेड विभागातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्र. विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 109 

जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन योजनेसाठी

आधार कार्डमोबाईल नंबर सादर करावेत

 

·    जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्डमोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत. जिल्हयातील सर्व वृध्द कलावंतानी आधार कार्डमोबाईल क्रमांक सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने संचालक सांस्कृतीक कार्य संचालनालय मुंबई यांनी केलेल्या सुचनेनुसार डीबीटी DBT (Direct Benifishri Transfer) मार्फत योजना राबविण्यासाठी सर्व वृध्द कलावंताचे आधार कार्डमोबाईल क्रमांक प्राप्त करुन घेण्याविषयी सुचना केली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्डमोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावीत. पंचायत समितीने सदर माहिती गुगल शीट Google Sheet मध्ये मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. जे कलावंत आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सादर करणार नाहीत त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नसल्याबाबत सुचना आहेतअसे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 108 

 वृत्त क्र. 107 

 शिवचरित्रावर आधारित खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन

·         जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव '  अंतर्गत राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदाननानाविध कलांचे जतन तथा संवर्धन होवून भारताच्या स्वातंत्र्य रणसंग्रामाची माहिती सामान्यजनांपर्यंततळागाळात पोहचविण्यासाठी 'महासंस्कृती महोत्सवातंर्गत जिल्हा प्रशासन नांदेड च्या वतीने  शिवचरित्रावर आधारित  जिल्हास्तरीय भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  

या स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगावर नेमून दिलेल्या जागेत रेखीव व सुबक रांगोळी काढणेअसा असणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वय व लिंगभेदाशिवाय या स्पर्धेत भाग घेता येईल. रांगोळी जास्तीतजास्त आकर्षितरेखीव व सुबक काढणे अपेक्षित आहे. या स्पर्धेचे आयोजन  18  फेब्रुवारी रोजी आयटीआय ग्राऊंड नांदेड येथे सकाळी 10 ते 12 या दोन तासात  केल्या जाणार आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या परीक्षकांच्यावतीने अंतिम निकाल घोषित केल्या जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या तीन रांगोळीस तथा काही रांगोळीस उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार 10 हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्हद्वितीय पुरस्कार हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्ह तथा तृतीय पुरस्कार हजार रुपयेसन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ काही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

स्पर्धेकरीता लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी सोबत आणणे आवश्यक आहे. सदरील  रांगोळी स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे  स्पर्धेपूर्वी नोंदणी करणे गरजेची आहेत. नाव नोंदणी करीता सुनील कोमवाडसुनील मुत्तेपवार व राजेश कुलकर्णीसंजय भालके यांच्याकडे जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलच्या पाठीमागेस्काऊट गाईड कार्यालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 11 ते यावेळेत 16 फेब्रुवारी 2024 पर्यत करण्यात यावी.

नोंदणीसाठी लागणारे प्रपत्र nanded.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभागी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मिनल करनवालनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ सविता बिरगे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 106 

 

पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र शासन कृषि विभागाअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे नांदेड जिल्हा कृषि महोत्सवातील नोंदणी कक्षात 7 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 वाजेपर्यंत स्पर्धकांनी नोंदणी करावी. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्या पासून बिस्कीट, लाडू, पापड, चिक्की, थालीपीठ, धपाटे, खिचडी, खीर, पराटे, चकल्या, बेकरी पदार्थ इ. असे विविध पदार्थ बनवून आणावेत. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र, भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांनी या तृणधान्य पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 105  

 

जिल्हा भरडधान्य महोत्सवास

नागरिकांनी भेट द्यावी

 ·         कृषी विभागाचे आवाहन                                       

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा भरडधान्य महोत्सवाचे आयोजन दिनांक  7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील प्रांगणात करण्यात आले आहे. या महोत्सवात भरडधान्यावर आधारित 40 ते 45 स्टॉलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोडो, राळा , भगर इत्यादी धान्यांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांनी तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी  महोत्सवास भेट देऊन लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

तसेच भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ हुरडा, नाचणीचे लाडू, बिस्किट्स, राजगिरा पापड, लाह्या, धपाटे इत्यादी खाद्य विक्री स्टॉल लावण्यात येणार आहेत.  तसेच इतरही कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. महिलांसाठी भरड धान्य पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. या महोत्सवात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र , महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय उत्पादक शेतकरी सहभागी होणार असून भरडधान्यांचे लागवड तंत्रज्ञान, भरडधान्यांचे पोषणमूल्य आणि आहारातील महत्त्व इत्यादी विषयी कृषी शास्त्रज्ञ आणि आहार तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...