Wednesday, January 18, 2017

केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 18 :- जिल्हयात मुदखेड, अर्धापूर तालुक्यात  केळीचे  क्षेत्र जास्त असल्यामुळे  केळी  पिकासाठी  किड   रोग सर्वेक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पांतर्गत तीन किड सर्वेक्षक  पिकावरील किड  रोगाचे सर्वेक्षण करीत आहेत. केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे  संदेश देण्यात येत आहे.
तापामानातील किमान घट ही करपा रोग वाढीसाठी पोषक असल्यामुळे करपारोग नियंत्रणासाठी  हिवाळयात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. दिवसा ऐवजी  क्यतो  रात्री  ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दयावे. बागेत तसेच बांधावर ठिक-ठिकाणी  रात्री शेकोटी  पेटवू धुर करावा. त्यामुळे शुष्क वातावरणातील उष्णता वाढते. थंड वाऱ्याच्या संरक्षणासाठी  बागेभेावती शेडनेट, ताटी अथवा बारदान यांचे कुंपन करावे तसेच संजीव कुंपन बागेभेावती नसल्यास कुंपन म्हणुन ज्वारी , बाजरी , मका  किंवा कडब्बा यांच्या पेंडया पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडील बाजुस लावावे. किमान तापमानातील घट करपा रोगांच्या वाढीसाठी पोषक आहे. पाण्याचा जास्त भाग  रोगग्रस्त झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने जास्तीतजास्त पाने  कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढुन एकत्र होतात. मोठा  ठिपका होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होत त्यासाठी लहान ठिपक्यावर  कार्बेन्डॅझिम  0.05 % (0.5 ग्रॅम / लिटर ) अधिक मिलरल ऑईल 1 %  (10 मिली लिटर)  प्रमाणत फवारणी करावीकेळी करपा रोगापासुन केळीचे होणारे नुकसान टाळावे,  असे आवाहन डॉ. व्ही. व्ही. भरगंडे  उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
मतदार जागृती चित्रकला स्पर्धेत मालेगावातील
समीरच्या चित्राला राष्ट्रीयस्तरावर नामांकन
नांदेड, दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय मतदार जागृती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला स्पर्धेत राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या नामांकनात नांदेडच्या मालेगाव (ता.अर्धापूर) येथील शेख समीर जिलानी याच्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिवस" दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आयोगाने यावर्षी आयोगाने विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या होत्या. त्यामध्ये 15 ते 18 या वयोगटातील विध्यार्थ्यासाठी "महत्व एका मताचे" या विषयावर चित्रकला स्पर्धां घेण्याचे सूचित करण्यात आलेले होते.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक तालुक्यातून दोन उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. सर्व तालुक्यातील उत्कृष्ठ चित्रांमधून जिल्हास्तरावर दोन उत्कृष्ट चित्र निवडून ती राज्यस्तरावर पाठविण्यात आली होती. राज्यस्तरावरून 36 जिल्ह्यातून प्राप्त चित्रांमधून 4 चित्रांचे नामांकन राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कै. मुंजाजी पाटील विद्यालय या शाळेतील शेख समीर जिलानी या विद्यार्थ्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड करण्यात येऊन, त्याचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मा. मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांनी केलेले आहे. राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या चित्रात नांदेडसह परभणी, यवतमाळ व पालघर जिल्ह्यातून प्रत्येकी एका चित्राचा समावेश आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इ स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलेले होते. याशिवाय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने जिल्ह्यात हायस्कूलमध्ये मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येत आहे. या समीरच्या या यशासाठी, त्याचे जिल्हा निवडणूक विभागाने अभिनंदन केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...