Friday, May 10, 2019

जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी
17 मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबईदि. 10 (रानिआ) : राज्यातील विविध 7 जिल्हा परिषदांमधील 9तर 12 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेतअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले कीया निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे,विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत)पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर)अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी)हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी)वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर)भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळपालघर (पालघर)- खैरापाडाहवेली (पुणे)- वाडेबोल्लाईकागल (कोल्हापूर)- माद्याळदेवळा (नाशिक)- महालपाटणेचाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारेनेवासा (अहमदनगर)- सोनईकर्जत (अहमदनगर)- कोरेगावकेज (बीड)- आडस,बिलोली (नांदेड)- अटकळीमाहूर (नांदेड)- वाई बामुखेड (नांदेड)- जांब बु.औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाखगोरेगाव (गोंदिया)- घोटीअर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
०-०-०

जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा
पाणी पुरवठा योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 10 :- पाणी पुरवठा योजनेतील तीन लाखापर्यंतची कामे तातडीने 20 मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भातील उपाययोजनेबाबत आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांचेसह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
श्री. डोंगरे म्हणाले, जिल्ह्यात मागणीनुसार टँकरच्या फेऱ्या पुर्ण करुन नागरिकांना वेळेवर शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. टंचाई काळात पाण्याअभावी कोणालाही त्रास होणार नाही यासाठी पाणी पुरवठ्यासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. जिल्ह्यात जलपुनर्भरणासारखी कामे मोठ्याप्रमाणे सुरु करुन पाणी आडवल्यास टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्न हा कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. या कामांबाबत तालुकास्तरावर नियमित आढावा घेऊन संबंधीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील कुटुंबांचे स्थलांतर होणार नाही यासाठी रोहयो अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावीत. यात प्रत्येक तालुक्यात  किमान एक हजार मजूर असली पाहिजेत. या मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करुन त्यांना वेळेवर मजुरी मिळेल यासाठी बँकेसह इतर आवश्यक माहितीची पडताळणी करुन घ्यावी. टंचाई निवारणासाठी नळ दुरुस्ती व तात्पुरती पुरक नळ योजनेतील कामे तातडीने पुर्ण करुन टंचाईग्रस्त भागाला दिलासा दयावा, असे निर्देश देऊन आवश्यक तेथे चारा छावणीची मागणी असल्यास त्यास मंजुरी दिली जाईल, असे श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
 बैठकीत पर्जन्यमान, जलाशयातील पाणीसाठा, पाणी आरक्षण मागणी, टँकर व विहिर / बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा, नळ योजना दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई, मनरेगा संदर्भातील कामांबाबत तालुकानिहाय आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...