Thursday, October 30, 2025

वृत्त क्रमांक  1142

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 30 ऑक्टोबर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 4.30 ते 4.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 4.45 ते 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा स्थळ-शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने समस्त आंबेडकरवादी समाज नांदेडच्यावतीने जाहीर नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- कै. शंकरराव चव्हाण सभागृह (स्टेडियम) नांदेड. सायंकाळी 7.45 वा. कै. शंकरराव चव्हाण सभागृह (स्टेडियम) नांदेड येथून वाहनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेडकडे प्रयाण. सायं. 8 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे आगमन. सायं. 8 ते 8.30 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथील विद्यार्थ्यांसोबत चर्चा. सायं. 8.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सायं. 8.45 ते 9.15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000



वृत्त क्रमांक  1141

दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन विभागासह इतर ठिकाणी संपन्न

नांदेड, दि. 30 ऑक्टोबर : राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2  नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम आज प्रादेशिक परिवहन कार्यालयासह विविध ठिकाणी घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता दिनकर व पोलीस अंमलदार पोहेका मेनका पवार, पोका सयद खदिर व चालक पोहेका रमेश नामपल्ले यांनी नांदेड जिल्हयातील वाजेगाव, आरटीओ कार्यालय नांदेड, सिडको-हडको परिसर तसेच पोलीस अंमलदार पोहेका यशवंत दाबनवाड व चालक पोहेका साईनाथ आचेवाड यांनी कंधार पंचायत समिती व भुमी अभिलेख कार्यालय कंधार येथे जावून कार्यालयाच्या बोर्डवर व दर्शनी भागावर दक्षता जनजागृती सप्ताह- 2025 चे फलक व स्टीकर लावून तेथे उपस्थित नागरिकांना जनजागृती संबंधाने प्रचार साहित्य वाटप करून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार करावी. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय इमारतीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे. 

जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय अधिकारी-कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात पुढील क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

पोलीस अधीक्षक संदीप पालवे : 02462-255811, मो. नंबर 9226484699.

अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम : 02462-255811

पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार : मो नंबर 9359056840.

टोल फ्रि : 1064.

ला.प्र.वि. नांदेड दुरध्वनी क्रमांक : 02462-253512.

वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in

मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net

फेसबुक पेज : www.facebook.com/maharashtraACB

टिव्टर : @ACBnanded

इन्स्ट्राग्राम :  acb_nanded

युट्यूब : @Anti Corruption BureauNanded.

000000





 वृत्त क्रमांक  1140

कृषि समृध्दी योजनेतील विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 30 ऑक्टोबर : कृषिक्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणेउत्पादन खर्च कमी करणेउत्पादकता वाढविणेपिक विविधीकरण करणेमुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि समृध्दी योजना हे सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतील विविध घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

 

या योजने अंतर्गत उत्पादकताशाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये हवामान अनुकूल बियाणेपिकांचे वैविध्यजमिनीची सुपीकता व्यवस्थापनयांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय डिजीटल शेतीकाटेकोर शेतीयंत्रसामुग्री सेवाकृषिगोदामप्रक्रिया व निर्यात यावर तसेच शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी, अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.

 

निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन देणेसाठी नियोजन केलेले असुन यासाठी शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभणे अपेक्षीत आहे. या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागु राहणार असुन प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (FCFS) देण्यात येणार आहे.

 

ही योजना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असुन योजनेंतर्ग शेतकरी महिला गटउत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येत आहे. अल्पअत्यल्प भुधाकरकमहिला शेतकरीअनुसूचित जातीजमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. या प्राधान्यक्रमाचा महा-डिबीटी प्रणालीमध्ये समावेश असल्याने कृषि विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन केले आहे.

 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड अधिनस्त तालुका कृषि अधिकारी यांना कृषि समृद्धी योजनेमध्ये विविध घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला असुन केंद्र व राज्य शासनाकडील सध्दस्थितीत असलेल्या योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये लाभार्थी निवड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करुन "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वानुसार केली जाणार असुन योजने मध्ये समाविष्ट घटक म्हणजेच,

 

एकात्मिक खत व्यवस्थापन अंतर्गत प्रोमखते प्रोत्साहन योजनाप्राथमिक प्रक्रिया अंतर्गत बीज प्रक्रिया संच स्थापन करणेकिसान ड्रोन योजनाजैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बीआरसी (स्थापन करणेकाढणे पश्चात व्यवस्थापन अंतर्गत गोदाम बांधकाम योजनाशेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्रव्यवस्थापन अंतर्गत प्रोमखते प्रोत्साहन योजनाप्राथमिक प्रक्रियाअंतर्गत बीज प्रक्रिया संच स्थापन करणेकिसान ड्रोन योजनाजैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बीआरसी (स्थापन करणे,काढणे पश्चात व्यवस्थापन अंतर्गत गोदाम बांधकाम योजनाशेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजनापिक प्रात्यक्षिक चिया पीकपीक प्रात्यक्षिक मका पीककॉटन श्रेडर इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी नांदेड  यांच्याकडे अर्ज सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी नांदेड कार्यालयाशी संपर्क साधून नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

 0000

 वृत्त क्रमांक  1139

“अमृत दुर्गोत्सव 2025”: छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

नांदेड, दि. 30 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत दुर्गोत्सव 2025”या राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-दुर्गांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून तो वारसा जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे. 

या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आपल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटी परिसरात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पन्हाळगड, लोहगड, पद्मदुर्ग, जिंजी, साल्हेर, विजयदुर्ग व खांदेरी या शिवकालीन 12 दुर्गांपैकी कोणताही एक दुर्ग साकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तयार झालेल्या दुर्गासोबत सेल्फी काढून ती www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. प्रत्येक सहभागीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात येणार असून, हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.

ही स्पर्धा नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान साजरा करण्याची संधी आहे. प्रत्येक घराघरात गड-दुर्ग उभे राहावेत, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे. या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांमध्ये शिवचरित्राबद्दल आदर, प्रेरणा आणि अभिमान वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांनी “अमृत दुर्गोत्सव 2025”या अनोख्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचा अभिमान साजरा करावा, असे आवाहन अमृतचे संचालक विजय जोशी यांनी केले आहे. 

000000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...