Wednesday, May 11, 2022

 ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव स्विकारण्‍यास 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ

 

·         ग्रामीण भागातील भुखंड गुंठेवारी प्रमाणपत्राचे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्‍ते वाटप  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- गुंठेवारीचे बरेच प्रस्‍ताव दाखल करावयाचे शिल्‍लक असल्‍याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल करण्‍यास गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्‍ते ग्रामिण भागातील भुखंडाच्या गुंठेवारी प्रमाणपत्रचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्‍यात आले.    

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नांदेड जिल्‍हयातील महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगर रचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्या मार्फत छाननी शुल्‍कासह प्रस्‍ताव दाखल करण्यास 3‍0 एप्रिल 2022 पर्यत  मुदत  देण्‍यात  आली  होती. त्यास आता गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.

0000



 मान्सूनपूर्व कामाच्या खबरदारीत

गाफील राहिल्यास कारवाई अटळ

-   जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह पैनगंगा, आसना, मन्याड, पुर्णा आदी नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वच जिल्ह्यात उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास नेहमीप्रमाणे नदीच्या पात्रात पाणी सोडण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये लहान-मोठे पाझर तलाव यांची संख्याही अधिक आहे. हे तलाव अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने महसूल यंत्रणेशी समन्वय साधत अधिक दक्षता घेतली पाहिजे. या कामात जर हलगर्जीपणा आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज नांदेड जिल्ह्याची मान्सूम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी विभागनिहाय आढावा घेतांना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदिप कुलकर्णी, जिल्ह्यातील निमंत्रीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

 

मान्सूनपूर्व विजा चमकण्याचे प्रमाण व त्या कोसळून अनेक ठिकाणी जीवितहानी होते. ही हानी रोखण्यासाठी प्रत्येकाने अधिक काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर पाझर तलाव नादुरूस्त असतील तर वेळप्रसंगी जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संकट येऊच नये यादृष्टीने सर्वच अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागा संदर्भात असलेली कामे प्राधान्याने पूर्ण केली पाहिजेत. विशेषत: पाझर तलाव यातील गाळ काढणे, सांडव्याच्या ठिकाणी झाडे-झुडपी वाढली असल्यास ती काढून टाकणे, मोठ्या धरणांनी विद्युत विभागाशी समन्वय साधून सर्व यंत्रणा तत्पर ठेवणे याची जबाबदारी व नियोजन काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे. कोणत्याही स्थितीत जिल्ह्यात मान्सूनमुळे जीवीत अथवा भौतिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अधिक दक्षता घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000

 महाविद्यालयाने शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करावेत   

 

· शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या  दोन विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात. तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल सुरु झाले आहे.

 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयात त्याची हार्डकॉपी जमा केलेली आहे. सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष संपलेले आहे. अद्यापही या अर्जावर महाविद्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मोठ्या प्रमाणात महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या कार्यालयामार्फत वेळोवेळी लेखी पत्राद्वारे व तोंडी सूचना देऊन अद्यापही महाविद्यालयाकडून यावर कार्यवाही झालेली नाही. ज्या महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत अशा महाविद्यालयांनी 20 मे 2022 पर्यंत पात्र अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या स्तरावर फॉरवर्ड करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

000000

 महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती धारकांनी

15 मे पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना (GOI), शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क (Freedhip), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी हे पोर्टल 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे. या  शिष्यवृत्तीचे अर्ज  अनेक महाविद्यालय आणि विद्यार्थी स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. प्रलंबित असलेले अर्ज अचूक पडताळणी करून रविवार 15 मे 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त कार्यालयास पाठवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 46 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 807 एवढी झाली असून यातील 1 लाख 112 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 337

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 81 हजार 302

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 807

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 112

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-03

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

 

000000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...