Wednesday, June 2, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 157 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर 323 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 245 अहवालापैकी  157 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 71 तर अँटिजेन तपासणीद्वारे 86अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 854 एवढी झाली असून यातील 86 हजार 460 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 14 रुग्ण उपचार घेत असून 30 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  2 जून 2021 रोजी लोटस कोविड रुग्णालय नांदेड येथे नांदेड येथील 57 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 31, देगलूर तालुक्यात 3, किनवट 2, नायगाव 2, नांदेड ग्रामीण 13, हदगाव 2, लोहा 1, उमरी 2, अर्धापूर 1, हिमायतनगर 1, मुदखेड 3, चंद्रपूर 1, भोकर 2, कंधार 3, मुखेड 3, हिंगोली 1 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 40, बिलोली तालुक्यात 1, कंधार 2, मुखेड 2, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 18, देगलूर 1, किनवट 2, नायगाव 2, हिंगोली 3, अर्धापूर 1, हदगाव 1, लोहा 3, नागपूर 1, भोकर 2, हिमायतनगर 2, माहूर 2, नंदुरबार 2 असे एकूण 157 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 323 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, किनवट कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 266, भोकर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 40, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 14 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 34, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  8, नायगाव कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 3, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, भोकर कोविड केअर सेंटर 1, देगलूर कोविड रुग्णालय 9,  एनआरआय कोविड केअर सेंटर 4, बिलोली कोविड केअर सेंटर  6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 564, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 237, खाजगी रुग्णालय 76 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 118 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 46 हजार 672

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 45  हजार 634

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 854

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 460

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.22 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-66

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-181

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-30

00000

 सारथी संस्थेच्या मुख्यालय इमारतीसाठी

पुणे शहरात शिवाजीनगर भाबुर्डा येथे जागा

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने संस्थेच्या मुख्यालय इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डामधील सी.स.नं. 173/1 ब मधील 4163 चौ.मीटर जमीन मुख्य रस्त्यालगत मिळाली. याचबरोबर संस्थेसाठी 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टाफ शासनाने 4 मे रोजी मंजूर केला. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली आहे. सारथी संचालक मंडळाची सभा 1 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षीत गटांच्या प्रगतीसाठी निर्णय घेण्यात आले.  

 

या बैठकीतील निर्णयात सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीचडीसाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्री कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दरवर्षी अंदाजे 500 रिक्त जागा घोषित होतात. यासाठी सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पुर्व)  (मुख्य) परीक्षांसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब गट क) पदांसाठी सन 2020-21 मध्ये अंदाजे 20 हजार रिक्त पदे जाहीर झाली. यासाठी सारथी पुणे मार्फत केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदाराना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दरवर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील 250 उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी सन 2020 मध्ये 74 रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण 400 उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

 

सारथी पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी 2019-20 मधील एमपीएससी पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्याचे विद्यावेतन एकूण 24 हजार रुपये अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही  एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वत:च्या निवडीनुसार निवड करु शकतात.

 

सारथी संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यात 948 जणांनी सहभाग नोंदविला यामध्ये 26 एप्रिल 2021 पर्यंत ई-मेलद्वारे सादर करण्याची मुदत होती. हे घोषवाक्य पूर्ण मराठीत असणे व जास्तीत जास्त 7 शब्दापर्यंत असणे अनिवार्य होते. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने "शाहू विचारांना देवूया गती, साधुया सर्वांगीण प्रगती" या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य जगदीश विष्णु दळवी यांनी पाठविले होते. त्यामूळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फे त्यांना 10 हजार रुपयाचा धनादेश देण्यात येणार आहे.

00000

 

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व दुसऱ्या डोससाठी 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना देण्यात येणार आहे. दिनांक 3 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. तर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय येथे दोन्ही गटातील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 30 डोस, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय व जंगमवाडी येथे प्रत्येकी 40 डोस तर हैदरबाग या केंद्रावर 90 डोस उपलब्ध आहेत. हे दोन्ही वयोगटातील म्हणजेच 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसरा डोससाठी वापरले जातील.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बारड, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील.

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. याचबरोबर ग्रामीण रुग्णालय कंधार व मुदखेड या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे अनुक्रमे 90 व 60 डोस उपलब्ध असून हे सुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोसाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल.  

 

जिल्ह्यात 1 जून पर्यंत एकुण 4 लाख 33 हजार 347 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 2 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 2 हजार 630 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 19 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 22 हजार 570 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

देवेंद्र फडणवीस यांचा दौरा   

नांदेड दि. 2 (जिमाका) :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. गुरुवार 3 जुन 2021 रोजी नांदेड येथून सकाळी 9.30 वाजता मोटारीने हिंगोली जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...