Monday, January 11, 2021

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क

अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 


नांदेड (जिमाका) दि.
 11 :- जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत.जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करु असा सक्त इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.


आज रात्री 8-00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून कोरोना लसीकरण आणि बर्ड फ्ल्यूबाबतच्या नियोजनाबाबत आढावा घेवून निर्देश दिले. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शरद पाटील, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000

 

 25 कोरोना बाधितांची भर तर

28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 25 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 518 अहवालापैकी 490 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 866 एवढी झाली असून यातील 20 हजार 733 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 354 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 4 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड तालुक्यात 1,माहूर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, पूर्णा तालुक्यात 1 असे एकुण 17 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, कंधार तालुक्यात 1, लोहा 1, मुखेड तालुक्यात 1  असे एकुण 8 बाधित आढळले.  

 

जिल्ह्यात 354 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 26, मुखेड कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 17, देगलूर कोविड रुग्णालय 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 145, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 60, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 34 आहेत.  

 

सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 62 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 1 हजार 23

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 65 हजार 122

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 866

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 733

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3  

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-354

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.            

00000 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...