Monday, September 6, 2021

 नांदेड जिल्ह्यात व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 718 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 762 एवढी झाली असून यातील 88 हजार 76 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 662 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे उमरखेड 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे बिलोली तालुक्यांतर्गत 1,कंधार तालुक्यातर्गत 1 असे एकुण 3 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात नायगाव तालुक्यातर्गत 4,उमरी तालुक्यातर्गत 1,व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 16 हजार 147

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 13 हजार 53

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 762

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 76

एकुण मृत्यू संख्या-हजार 662

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 7 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयस्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबागशिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगर (विजयनगर)सिडकोपौर्णिमा नगरसांगवीकरबलातरोडाविनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयस्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबागशिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगर (विजयनगर)सिडकोपौर्णिमा नगरसांगवीकरबलातरोडाविनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस लस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगावगोकुंदामुखेडग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबादहिमायतनगरकंधारमाहूरमांडवीमुदखेडबारडनायगावउमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगावगोकुंदामुखेड ग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबाद, हिमायतनगरकंधारमाहूरमांडवीलोहामुदखेडबारडनायगावउमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 5 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 72 हजार 840 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 6 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 67 हजार 30 डोसकोव्हॅक्सीनचे लाख 88 हजार 160 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 55 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 सुधारित वृत्त

नांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचा 

मापदंड म्हणून "मिशन आपुलकी" ओळखली जाईल

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांची व्यापक बैठक 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा व्यापक आहे तेवढाच तो गुणवत्तेनेही समृद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाप्रती ओढ असून गावासाठी काही तरी करण्याची भावना शेतकऱ्यांपासून सर्वांची आहे. या सर्वांच्या श्रद्धा व भावनांना व्यापक कर्तव्याच्या पूर्तीत रुपांतरीत करता यावे यासाठी "मिशन आपुलकी" हा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. सर्वांच्या सहभागाचे प्रतीक म्हणून "मिशन आपुलकी" च्या नावाने नांदेड जिल्हा नवा मापदंड निर्माण करेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

या उपक्रमासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामसेवक-कृषिसेवक-तलाठी यांच्यापासून तालुका ते जिल्हा पातळीवरील सर्व प्रमुखांच्या आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी अभय चौधरी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आदी उपस्थित होते. तर सर्व तालुकापातळीवरुन संबंधित उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपातळीवरील तलाठी, कृषि सेवक, ग्रामसेवक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभाग घेतला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना आपल्या गावाप्रती प्रत्येकांच्या मनात कृतज्ञता आणि उत्तरदायीत्त्वाची भावना ही मोलाची आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने गावातील शाळेसाठी, अंगणवाडीसाठी अथवा पशुधनाच्या निमित्ताने काही योगदान दिल्यास त्या-त्या सेवासुविधा अधिक भक्कम होतील. यातून आपल्या कर्तव्यपूर्तीची भावना आणि त्यातील समाधान प्रत्येकाला घेता येईल असे सांगून त्यांनी "मिशन आपुलकी" या उपक्रमाला अधिक भक्कम करण्याचे आवाहन केले. 

प्रत्येक गावातील सामान्यातील सामान्य माणसापासून कोणालाही यात आपला सहभाग घेता येईल. यातून आपल्या गावाला खऱ्या अर्थाने लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या कर्तव्य प्रधान गावात रुपांतरीत करता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यात सुमारे 9 हजारापेक्षा अधिक शिक्षक आहेत. 20 ते 25 हजार पेक्षा जास्त मनुष्यबळ हे विविध विभाग आणि कार्यालयाशी संबंधित आहे. यातील बहुतांश वर्ग हा नांदेड जिल्ह्यातीलच असल्याने प्रत्येकाने आपल्या गावासाठी पुढे येऊन मदत करणे हे अपेक्षित आहे. यात प्रत्येकाचा सहभाग तळमळीने आल्यास परस्पर विश्वासर्हतेच्या माध्यमातून गावाला विकासाच्या प्रवाहात सहज आणता येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

कृषि सेवक, तलाठी, ग्रामसेवक ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी बांधिल असलेली शासनाच्या त्रीसुत्रीतील प्रमुख घटक आहेत. या त्रीसुत्रीनी आपली जबाबदारी व कर्तव्य निष्ठेने पार पाडून गावातील लोकांचाही विश्वास संपादन केल्यास "मिशन अपुलकी" मार्फत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जाऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या. 

प्रत्येक विभागातील गावात नेमके काय करता येऊ शकेल याचा आराखडा येत्या काही दिवसात तयार करुन त्याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या बैठकीत दिले. "मिशन आपुलकी"ची माहिती जिल्ह्यातील सर्वांना व्हावी या उद्देशाने मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायं. 6 वा. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे फेसबुक लाईव्ह ठेवण्यात आले आहे. 

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...