Tuesday, November 28, 2023

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

     लातूर, दि. 28 (विमाका):-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

        शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

***

 जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  नांदेड शहरातील जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700)  (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरणनाली बांधकामरस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्यात येत असल्यामुळे जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या रस्त्याच्या काम सुरु करावयाचे असल्यामुळे वाहतुकीस जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या प्रतिबंधित मार्गाऐवजी जुना मोंढा वजीराबाद कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 25 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात 9 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

दि. 26.11.2023

 संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला उत्स्फूर्त सहभाग

·         संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. सुरवातीला जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यानंतर त्यांनी  संविधान रॅलीला  हिरवी झेंडी दाखवली.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरेसमाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांची उपस्थिती होती. या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगरकलामंदिरमुथा चौकछत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

 

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा. सर्वानी घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्ये त्यांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयील अधिकारी कर्मचारीजाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारीबार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत तसेच विविध महामंडळाचे कर्मचारी यांची उपस्थिती होते.

 

या संविधान रॅली मध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक कर्मचारी सुनिल पारधे यांच्या अधिपत्याखालील बँड पथक संच यांनी गीत सादर केले. या रॅलीमध्ये महात्मा फुले हायस्कुल येथील स्काऊट गाईड व एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंतराव नाईक महाविद्यालयजवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयनोबल हास्कुलपंचशिल विद्यालयसायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.  शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षककर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे रॅलीत सहभागी झाले होते तसेच जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

00000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...