Monday, August 21, 2017

विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ
गोदावरी नदीकाठातील गावांना सर्तकतेचा इशारा
          नांदेड, दि. 21 :- येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. 354 मीटर होती. प्रकल्पातील पाणीसाठा 65.25 द.ल.घ.मी. असून प्रकल्पात 81 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात पाण्याचा येवा वाढत असल्याने आवश्यकतेनुसार वेळोवळी प्रकल्पाचे गेट उघडावी लागतील. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सर्तकता बाळगावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा हा 741 घनमीटर प्रती सेकंद वेगाने येत आहे. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा ताशी 2.66 द.ल.घ.मी.ने वाढत आहे. सोमवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. एक गेट उघडण्यात आले आहे. यापुढे आवश्यकतेनुसार वेळोवेळी प्रकल्पाचे गेट उघडावी लागतील. आपतकालीन परिस्थितीत गेट उघडण्याची पुर्व सुचना देणे शक्य होणार नाही. सर्व यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनेच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती दिली आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 18.46 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 46.23 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात सोमवार 21 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 18.46 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 295.38  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 441.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 46.23 टक्के एवढा पाऊस झाला आहे.  
जिल्ह्यात सोमवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 72.63 (701.51), मुदखेड- 19.67 (610.17), अर्धापूर- 33.33 (506.66), भोकर- 12.75 (466.25), उमरी- 11.33 (415.00) कंधार- 20.67 (421.34), लोहा- 55.50 (461.83), किनवट- 8.86 (419.15), माहूर- 6.50 (358.90), हदगाव- 17.57 (473.47), हिमायतनगर- 14.00 (349.16), देगलूर- 2.00 (254.33), बिलोली- 4.20 (400.00), धर्माबाद- 3.00 (423.33), नायगाव- 4.80 (407.66), मुखेड- 8.57 (399.43) आज अखेर पावसाची सरासरी 441.76 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7068.19) मिलीमीटर आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...