Saturday, January 29, 2022

 नांदेड जिल्ह्यात 381 व्यक्ती कोरोना बाधित

तर 984 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 123 अहवालापैकी 381 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 335 तर अँटिजेन तपासणीद्वारे 46 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 235 एवढी झाली असून यातील 95 हजार 678 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 892 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 665 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 207, धर्माबाद 4, लोहा 8, बिलोली 4, वाशीम 1, हिंगोली 5, नाशीक 1, नांदेड ग्रामीण 32, कंधार 4, मुदखेड 2, उमरी 2, परभणी 7, अमरावती 1, राजस्थान 1, भोकर 4, हदगाव 1, मुखेड 15, नायगाव 14, अकोला 1, तेलंगणा 2, औरंगाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, धर्माबाद 1, मुखेड 5, नांदेड ग्रामीण 7, किनवट 2, हदगाव 1, बिलोली 6, अर्धापूर 3, देगलूर 2, मुदखेड 1 एकुण 381 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 778, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 187, खाजगी रुग्णालय 10, जिल्‍हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4 असे एकुण 984 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 34, किनवट कोविड रुग्णालय 1नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 293,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 532, खाजगी रुग्णालय 32असे एकुण 2 हजार 892  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 42 हजार 386

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 25 हजार 746

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 235

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 95 हजार 678

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 665

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-86

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 892

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...