एमसीएमसी समितीच्या मिडिया सेंटरमध्ये
जिल्ह्यातील रेडिओ प्रतिनिधी व प्रकाशकांची बैठक
संपन्न
नांदेड,दि. 3 :- 16- लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचार आणि प्रसार
माध्यमातून प्रचार करण्यात येणा-या साहित्याविषयी तसेच संख्या यासंदर्भात
आकाशवाणीवरुन प्रसारित होणा-या प्रचारपर जाहिरातीच्या प्रमाणकीकरण करुन घेवूनच
प्रसारित करावी. प्रकाशक , मुद्रक आणि
विविध एफएम वाहिन्यांचे प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मिडिया
कक्षात आज बैठक घेण्यात आली.
या बैठकीस माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव
श्रीमती मीरा ढास, प्रा. डॉ. दीपक शिंदे, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे, श्री. जटाळे आदि सदस्यांची या बैठकीस उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान प्रचार साहित्यासंदर्भात
उमेदवारांनी छापाई केलेला मजकूर आणि छापिल प्रतींची संख्या याची माहिती प्रमाणन
करुन घेण्यासाठी प्रथम एमसीएमसी कमिटीकडे देणे आवश्यक आहे. तसेच आकाशवाणीवरुन
प्रसारित होणा-या जिंगल्स किंवा जाहिराती याही प्रमाणित करुन घेवूनच प्रसारित
करण्यात याव्यात. समाज माध्यमावरुन प्रसारित करण्यात येणा-या जाहिराती तसेच या
अनुषंगाने येणा-या विविध परवानग्या देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र
चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
प्रकाशक डॉ. आबासाहेब कल्याणकर, सुनिल गोधणे, सु.ग. चव्हाण, शिवानंद सुरकुटवार, साहेबराव शंकरराव बेळे, आकाशवाणीचे कार्यक्रम
अधिकारी व्ही.आर. वाघमारे, रेडिओचे प्रतिनिधी दीपक रत्नपारखी
(रेड एफएम), शशिकांत महामुणे (माय एफएम), संकेत इनामदार (रेड एफएम), आर. पी. आत्राम (ऑल
इंडिया रेडिओ), गौतम पट्टेबहादूर (ऑल इंडिया रेडिओ), शंकर भोसले (रेडिओ सिटी) यांची
उपस्थिती होती.
0000