नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत
एकूण 65.15 टक्के मतदान
नांदेड, दि. 18 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण 65.15 टक्के मतदान झाले.
16- नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते.
यात पुरुष मतदार संख्या 8 लाख 91 हजार 105 तर महिला मतदार संख्या 8 लाख 26
हजार 662 तसेच इतर 63 मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 11
लाख 19 हजार 116 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात
पुरुष मतदार संख्या 5 लाख 94 हजार 614, स्त्री मतदार संख्या
5 लाख 24 हजार 490, इतर 12 असे एकूण 11 लाख 19 हजार 116
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्रातून
मतदान प्रकिया पार पडली. 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय
माहिती पुढील प्रमाणे.
85-भोकर- स्त्री मतदार
संख्या 91 हजार 389, पुरुष
मतदार संख्या 1 लाख 4 हजार 419 , इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 95 हजार 809 (टक्केवारी 70.71),
86-नांदेड उत्तर- स्त्री मतदार
संख्या 90 हजार 268 , पुरुष
मतदार संख्या 1 लाख 2 हजार 997 इतर 10
असे एकूण झालेले मतदान 1 लाख 93 हजार 275 (टक्केवारी 62.73),
87-नांदेड दक्षिण- स्त्री
मतदार संख्या 83 हजार 181, पुरुष मतदार
संख्या 97 हजार 284 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 80 हजार 465 (टक्केवारी 64.17),
89-नायगाव खै.- स्त्री मतदार
संख्या 92 हजार 882, पुरुष मतदार
संख्या 1 लाख 4 हजार 539 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 97 हजार 421 (टक्केवारी
69.79),
90-देगलूर- स्त्री मतदार
संख्या 86 हजार 733, पुरुष
मतदार संख्या 96 हजार 793 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 83 हजार 526 (टक्केवारी
63.31),
91-मुखेड- स्त्री मतदार
संख्या 80 हजार 37 , पुरुष
मतदार संख्या 88 हजार 582, इतर एक असे एकूण झालेले मतदान 1
लाख 68 हजार 620 (टक्केवारी 60.48) एवढे आहे.
0000