Friday, April 19, 2019


नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत
एकूण 65.15 टक्‍के मतदान
नांदेड, दि. 18 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण 65.15 टक्के मतदान झाले.          
       16- नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते. यात पुरुष मतदार संख्‍या 8 लाख 91 हजार 105 तर महिला मतदार संख्‍या  8 लाख 26 हजार 662 तसेच इतर 63 मतदारांचा समावेश होता. त्‍यापैकी 11 लाख 19 हजार 116 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला आहे. यात पुरुष मतदार संख्‍या 5 लाख 94 हजार 614, स्‍त्री मतदार संख्‍या 5 लाख 24 हजार 490, इतर 12 असे एकूण  11 लाख 19 हजार 116 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे.
           
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी मतदारसंघात विविध उपक्रम राबविले होते. तसेच व्‍होट फॉर वॉक पदयात्रा काढून मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी त्‍यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. प्रशासनाने केलेल्‍या मतदान जनजागृतीमुळे पाच टक्‍क्‍यांनी मतदानाचा टक्‍का वाढला आहे. 
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्रातून मतदान प्रकिया पार पडली. 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे.
85-भोकर-  स्त्री मतदार संख्‍या 91 हजार 389, पुरुष मतदार संख्‍या  1 लाख 4 हजार 419 , इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 95 हजार 809 (टक्‍केवारी 70.71),
86-नांदेड उत्‍तर-  स्त्री मतदार संख्‍या 90 हजार 268 , पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 2 हजार 997 इतर 10  असे एकूण झालेले मतदान 1 लाख 93 हजार 275 (टक्‍केवारी 62.73),
87-नांदेड दक्षिण-  स्त्री मतदार संख्‍या 83 हजार 181, पुरुष मतदार संख्‍या 97 हजार 284 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 80 हजार 465 (टक्‍केवारी 64.17),
89-नायगाव खै.-  स्त्री मतदार संख्‍या 92 हजार 882, पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 4 हजार 539 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 97 हजार 421 (टक्‍केवारी 69.79),
90-देगलूर-  स्त्री मतदार संख्‍या 86 हजार 733, पुरुष मतदार संख्‍या 96 हजार 793 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 83 हजार 526 (टक्‍केवारी 63.31),
91-मुखेड-  स्त्री मतदार संख्‍या 80 हजार 37 , पुरुष मतदार संख्‍या 88 हजार 582, इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 68 हजार 620 (टक्‍केवारी 60.48) एवढे आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...