Thursday, September 23, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 745 अहवालापैकी नांदेड मनपा क्षेत्रात आरटीपीसीआर तपासणी अहवालद्वारे 1 कोरोना बाधित आढळला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 308 एवढी झाली असून यातील 87 हजार 635 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आज यात मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 28 हजार 231

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 24 हजार 903

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 308

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 635

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 जिल्ह्यातील 85 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 85 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 24 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, रेल्वे हॉस्पिटल येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 50 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 13 लाख 74 हजार 473 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 11 लाख 06 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 10 हजार 720 डोस याप्रमाणे एकुण 14 लाख 16 हजार 750 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 डीएलएड प्रथम वर्षासाठी विशेष फेरी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 23 :- प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलएड) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या 3 फेऱ्या घेण्यात आल्या. परंतू शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्या भरण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी केले आहे. सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयानिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होईल. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण खुला संवर्गासाठी 49.5 टक्के तर इतर संवर्गासाठी 44.50 टक्के गुण आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 24 ते 28 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत राहील. पडताळणी केंद्रावर जाऊन मुळ प्रमाणपत्रे पडताळणी 24 ते 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्गासाठी 200 रुपये, तर खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी 100 रुपये राहील. ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रुव्ह करुन घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांच्या अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज अप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रीयेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधुनच प्रवेश घेऊन अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेच प्रवेशपत्र स्वत: ईमेल / लॉगीनमधून प्रिंट घेऊन अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था, श्रीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा.

0000000

 

 निर्यातदार संमेलन आज

नांदेड (जिमाका) दि. 23:- आझादी का अमृत महोत्सव 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापदिनामित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदाराचे संमेलन 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा उद्योग केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे.  

जिल्ह्यातील निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टिने उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हृयात जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना करण्यात आली. जिल्हृयात निर्यात वाढविण्यासाठी विविध केंद्र व जिल्हा कार्यालये,औद्योगिक संघटना, निर्यात परिषद, निर्यात सल्लागार यांच्या सतत पाठपुरवठा, समन्वय व अडीअडचणी  दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रचालन परिषदेस सहकार्य करण्यासाठी  शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची समिती गठीत करण्यात आली आहे.  

या चर्चासत्रासाठी निर्यातदार, निर्यातक्षम,उद्योजक, नवउद्योजक औद्योगिक संस्था, व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहत, शेतकरी, सहकारी संस्था, उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक इ. सदर संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्यात प्रचालन समितीचे सचिव यांनी केले आहे.

00000

समयबध्द शिष्यवृत्ती महाविशेष मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 23 :- मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या करिता सन 2021-22 या वर्षातील  एकच अभियान विद्यार्थी कल्याण अंतर्गत 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान  मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना समयबध्द शिष्यवृती माह विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत.या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 8 वी फक्त मुलीकरिता (अनु.जाती/विजाभज विमाप्र/इमाव स्वतंत्रपणे) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 8 वी  10 पर्यंतच्या मुलींसाठी आहे (अनु.जाती/विजाभज विमाप्र/इमाव स्वतंत्रपणे) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृती योजना . परीक्षा फी योजना इयत्ता 10 (अनु.जाती/विजाभज विमाप्र) भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना अनु.जाती इयत्ता 9 वी ते 10 गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 वी ते 10 (अनु.जाती/विजाभज विमाप्र) इयत्ता 1 ली 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.इयत्ता 1 ली 10 वीमध्ये शिकणाऱ्या विजाभज (DNT) च्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना. विशेष मोहिमे अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना शिष्यवृत्ती बाबत माहिती देणे.शिष्यवृत्ती धारक पालक गावातील समाजसेवक प्रतिष्ठीत व्यक्तींना या योजनांची माहिती देवून प्रचार व प्रसिध्दी मध्ये सहभागी करुन घेणे.मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेणे ग्रामसभेमध्ये योजनाची माहिती देणे.विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करिता आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार करणे यासाठी जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचे बँकखाते संबंधित यंत्रणा तहसिलदार कार्यालय सर्व तालुके यांनी विद्यार्थ्यांना सन 2021-22 जातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाण देणे तसेच बँक खाते उघडण्याकरिता बँक मॅनेजर यांना निर्देश देणे.

कागदपत्राची पुर्तता होताच 1 ते 10 ऑक्टोबर  पर्यंत शिष्यवृत्ती  प्रस्तावाचे संकलन करणे व प्रस्ताव तपासणी करून परिपूर्ण प्रस्ताव विहित नमून्यात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.याशिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी केले आहे. 

000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...