Friday, June 15, 2018


जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित
सदस्यांचे बुधवारी यशदा येथे प्रशिक्षण
नांदेड दि. 15 :- जिल्हा नियोजन समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण बुधवार 20 जून 2018 रोजी यशदा पुणे येथे आयोजित केले आहे. नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सर्व नवनिर्वाचित मा. सदस्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे प्रशिक्षण देण्याबाबत मुद्दा मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार यशदा पुणे यांचेशी संपर्क करुन या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपद्धती, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, जिल्हा नियोजन समितीच्या सभेबाबतची माहिती तसेच विविध योजनेंतर्गत कामांना मंजुरी, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाबाबतची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना देण्यात येणार आहे. त्याआधारे समिती मार्फत जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाबाबत संकल्पना स्पष्ट होणार असल्याने योग्य प्रकारे विकास कामांचा आराखडा तयार होईल व त्याची अंमलबजावणी करण्यास गती येईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
0000000


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा
नांदेड दि. 15 :- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 28 जून 2018 रोजी हिंगोली येथून शासकीय मोटारीने दुपारी 1 वा. नांदेड येथे आगमन व नांदेड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड ). दुपारी 2.30 वा. नांदेड येथुन शासकीय मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.  
0000


बिलोली तालुक्यातील सेवारत सैनिक
विनोद हणुमंतराव वानोळे यांचा मृत्यू
नांदेड दि. 15 :- सैन्य नंबर 17012132 शिपाई विनोद हनुमंतराव वानोळे  रा. लोहगाव  ता. बिलोली जिल्हा नांदेड यांचा गुरुवार 14 जुन 2018 रोजी  सैन्यसेवेत असताना मृत्यु झाला आहे. शिपाई विनोद हे सन 2010 मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते ई.एम.ई.चे जवान होते व ते पठाणकोट येथील युनिट 864 फिल्ड वर्कशॉप मध्ये कार्यरत होते.    त्यांच्या मृत्युची बातमी त्यांच्या कुटूंबियांकडून कळताच जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने सर्व संबधितांशी  संपर्क  केला आहे.  बिलोलीचे तहसिलदार श्रीकांत गायकवाड यांनी कुंटूबियांची  भेट घेतली आहे. तसेच  मेजर सुभाष सासने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी युनिटचे कंमाडींग अधिकारी कर्नल इंगळे यांच्याशी संपर्क केला असता मृत्यू झाल्याचे सांगीतले. त्यांचा मृतदेह हा  सर्व कार्यालयीन कार्यवाही पुर्ण करुन शनिवार 16 जुन 2018 रोजी विमानाने हैद्राबाद पर्यंत व नंतर वाहनाने त्यांच्या घरी पोहचविण्यात येईल,  अशी  प्राथमिक माहिती  माहिती देण्यात आली.  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय  सर्वांशी संपर्कात  योग्य कार्यवाही करत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी सांगितले आहे.
00000


दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात शनिवार 16 जून 2018 रोजी मुस्लिम बांधवाच्यावतीने रमजान ईद (चंद्र दर्शनानुसार) साजरी करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडणार नाही, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 149 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 16 जून रोजी रमजान ईद निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
0000000


ब्रिगेडियर डी. के. पात्रा यांनी
माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेतल्या
नांदेड, दि. 15 :- औरंगाबादचे स्टेशन कमांडर  ब्रिगेडियर डी. के. पात्रा यांनी 13 जून रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला भेट दिली. यावेळी माजी सैनिक / विधवा व वीरपत्नी, वीरपीता यांचे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत माजी सैनिकांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची ब्रिगेडियर श्री. पात्रा यांनी भेट घेवून माजी सैनिकांचे प्रकरणे लवकर निकाली काढावे यासाठी चर्चा केली.
यामध्ये प्रमुख्याने माजी सैनिकांच्या जागेवर अतिक्रमण करण्याचे प्रकरणे होती. तसेच ECHS मध्ये नवीन कार्ड बनविण्यासाठी कार्यवाही करावी. नांदेडची CSD Canteen लवकर सुरु करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केली यावर कमांडर  ब्रिगेडियर श्री. पात्रा यांनी  Grocery Store सुरु करण्याबाबत कार्यवाही होत असल्याचे सांगितले. स्टेशन कमांडर यांनी ECHS साठी नवीन इमारत तयार करणार असल्याचे सांगितले. स्टेशन कमांडर सोबत कर्नल आर. शर्मा व Oic Echs गृप कमांडर रामाकृष्ण उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी करुन  स्टेशन  कमांडर यांना नांदेडच्या माजी सैनिकांचे समस्याबाबत माहिती दिली. बैठकीस जवळपास 80 माजी सैनिक / विधवा व वीरपत्नी, वीरपीता होते. कार्यालयातील कल्याण संघटक  सतेंद्र चवरे, श्री. कदम यांनी बैठकीचे संयोजन केले.
संगठक चे अध्यक्ष श्री संजय पोतदार, श्री पठान हयुन व श्री देशमुख वेंकट यांनी माजी सैनिकांच्या ECHS  मध्ये येणाऱ्या समस्यां मांडल्या.  विष्णुपूरी येथील ECHS ची नवीन जागेची पाहणी करण्यात आली व सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे भेट देवून CSD जागेची पाहणी करण्यात आली.
00000


खरीप पीक कर्ज वाटपासाठी
मंडळस्तरावर मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यातील तालुका उपनिबंधक / सहायक निबंधक सहकारी संस्था यांना आप-आपल्या तालक्यात मंडळनिहाय कर्ज वाटपाबाबत बँकांच्या मदतीने मेळावे आयोजीत करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणेबाबत निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पीक कर्ज वाटपा अडचण ये नये आणि बँक, प्रशासनाच्या परस्पर सहकार्याने कर्ज वाटप प्रक्रिया जलद व सुकर होण्यासाठी राज्य शासनाकडून सूलभ पीक कर्ज वाटप अभियान राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आहेत किंवा मागणी करुनही कर्ज उपलब्ध होत नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुका उपनिबंधक / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत सर्व बँकाच्या प्रतिनिधीना जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी जलदगतीने पीक कर्ज वाटप करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधत प्रशासकय यंत्रणेस आदेश दिले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप प्राधान्याने करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना दिल्या आहेत.
नांदेड जिल्हा सुलभ पीक कर्ज वाटप अभियान मेळाव्याचे जून 2018 चे नियोजन
तालुक्याचे नाव
मेळाव्याचे ठिकाण
सहभागी बॅंका
मेळावा दिनांक

किनवट
 किनवट
नांदेड जि.म.स.बॅंक
18.6.2018

 मांडवी
स्टेट बॅक ऑफ इंडिया
20.6.2018

बोधडी बु.
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
22.6.2018

 इस्लापूर
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
25.6.2018

 सारखणी
स्टेट बॅक ऑफ इंडिया
27.6.2018

 शिवणी
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
29.6.2018

नायगाव
नायगाव
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, बॅंक ऑफ इंडिया 
18.6.2018

नरसी
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, बॅंक ऑफ इंडिया 
20.6.2018

कुंटूर
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक 
22.6.2018

मांजरम
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक 
25.6.2018

हदगाव
हदगाव
नांदेड जि.म.स.बँक
18.6.2018

तामसा
नांदेड जि.म.स.बँक
20.6.2018

आष्टी
नांदेड जि.म.स.बँक
22.6.2018

बरडशेवाळा
नांदेड जि.म.स.बँक
25.6.2018

मनाठा
नांदेड जि.म.स.बँक
27.6.2018

निवघा
नांदेड जि.म.स.बँक
29.6.2018

धर्माबाद
धर्माबाद
स्टेट बॅक ऑफ इंडिया
18.6.2018

धर्माबाद
बँक ऑफ महाराष्ट्र
20.6.2018

धर्माबाद
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
22.6.2018

येताळा
स्टेट बॅक ऑफ इंडिया
25.6.2018

करखेली
देना बँक शाखा करखेली
27.6.2018

मुखेड
मुखेड
स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक,
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
18.6.2018

गोजेगाव
स्टेट बँक ऑफ इंडिया,
20.6.2018

जाहुर
महाराष्ट्र ग्रामीण बँक
22.6.2018

जांब
महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिमस बँक
25.6.2018

मुक्रमाबाद
स्टेट बँक ऑफ इंडिया,महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिमस बँक
27.6.2018

चांडोळा
महाराष्ट्र ग्रामीण बँक
28.6.2018

बेटमोगरा
महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिमस बँक
29.6.2018

बा-हाळी
महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिमस बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया,
30.6.2018

आंबुलगा
नांदेड जि.म.स.बॅंक,
26.6.2018

भोकर
भोकर
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, देना बँक
18.6.2018

किनी
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
20.6.2018

मातूळ
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
22.6.2018

उमरी
उमरी
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया 
18.6.2018

गोळेगांव
नांदेड जि.म.स.बॅंक
20.6.2018

अर्धापूर
पांगरी
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, बॅंक ऑफ इंडिया 
18.6.2018

जांभरुन
20.6.2018

भोगांव
22.6.2018

मुदखेड
बारड
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
18.6.2018

मुदखेड
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, देना बॅक
20.6.2018

माळकौठा
नांदेड जि.म.स.बॅंक, देना बॅक
22.6.2018

मुगट
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया,
25.6.2018

बिलोली
सगरोळी
बँक ऑफ महाराष्ट्रा,नांदेड जि.म.स.
18.6.2018

कुंडलवाडी
देना बँक, नांदेड जि.म.स., महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया
20.6.2018

लोहगांव
 स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
22.6.2018

कासराळी
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
25.6.2018

हिमायतनगर
हिमायतनगर
नांदेड जि.म.स.
18.6.2018

सरसम बु.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
20.6.2018

कामारी
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
22.6.2018

देगलूर
देगलूर
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
18.6.2018

शहापूर
नांदेड जि.म.स.,आय.डी.बी.आय.
20.6.2018

मरखेल
नांदेड जि.म.स.
22.6.2018

करडखेड
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक
25.6.2018

कंधार
कंधार
नांदेड जि.म.स.बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
18.6.2018

उस्माननगर
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
20.6.2018

बारुळ
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक
22.6.2018

कुरुळा
नांदेड जि.म.स.बँक, आय.डी.बी.आय.
25.6.2018

पेठवडज
नांदेड जि.म.स.बॅंक,  महाराष्ट्र ग्रामीण बॅक
27.6.2018

फुलवळ
नांदेड जि.म.स., महाराष्ट्र ग्रामीण बँक,स्टेट बॅंक ऑफ इंडिया
28.6.2018

दिग्रस बु.
नांदेड जि.म.स.बॅंक,  महाराष्ट्र ग्रामीण बॅक
30.6.2018

लोहा
लोहा
देना बँक, नांदेड जि.म.स., महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया
18.6.2018

सोनखेड
नांदेड जि.म.स.बॅक., महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया
20.6.2018

मारतळा
नांदेड जि.म.स.बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक,बँक ऑफ महाराष्ट्रा
22.6.2018

माळाकोळी
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बँक
25.6.2018

नांदेड
नवा मोंढा
नांदेड जि.म.स.बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बँक
18.6.2018

नाळेश्वर
नांदेड जि. म. स.बॅंक, व संबंधित बँक
20.6.2018

मरळक
नांदेड जि. म. स.बॅंक, व संबंधित बँक
22.6.2018

बाबुळगाव
नांदेड जि. म. स.बॅंक, व संबंधित बँक
25.6.2018

तरोडा बु.
नांदेड जि. म. स.बॅंक, व संबंधित बँक
27.6.2018

सांगवी बु.
नांदेड जि. म. स.बॅंक, व संबंधित बँक
29.6.2018

माहूर
माहूर
जिमस बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एसबीआय,
18.6.2018

वाई बाजार
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
20.6.2018

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...