Friday, June 15, 2018


बिलोली तालुक्यातील सेवारत सैनिक
विनोद हणुमंतराव वानोळे यांचा मृत्यू
नांदेड दि. 15 :- सैन्य नंबर 17012132 शिपाई विनोद हनुमंतराव वानोळे  रा. लोहगाव  ता. बिलोली जिल्हा नांदेड यांचा गुरुवार 14 जुन 2018 रोजी  सैन्यसेवेत असताना मृत्यु झाला आहे. शिपाई विनोद हे सन 2010 मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते ई.एम.ई.चे जवान होते व ते पठाणकोट येथील युनिट 864 फिल्ड वर्कशॉप मध्ये कार्यरत होते.    त्यांच्या मृत्युची बातमी त्यांच्या कुटूंबियांकडून कळताच जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने सर्व संबधितांशी  संपर्क  केला आहे.  बिलोलीचे तहसिलदार श्रीकांत गायकवाड यांनी कुंटूबियांची  भेट घेतली आहे. तसेच  मेजर सुभाष सासने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी युनिटचे कंमाडींग अधिकारी कर्नल इंगळे यांच्याशी संपर्क केला असता मृत्यू झाल्याचे सांगीतले. त्यांचा मृतदेह हा  सर्व कार्यालयीन कार्यवाही पुर्ण करुन शनिवार 16 जुन 2018 रोजी विमानाने हैद्राबाद पर्यंत व नंतर वाहनाने त्यांच्या घरी पोहचविण्यात येईल,  अशी  प्राथमिक माहिती  माहिती देण्यात आली.  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय  सर्वांशी संपर्कात  योग्य कार्यवाही करत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी सांगितले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...