Friday, June 15, 2018


दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात शनिवार 16 जून 2018 रोजी मुस्लिम बांधवाच्यावतीने रमजान ईद (चंद्र दर्शनानुसार) साजरी करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडणार नाही, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 149 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 16 जून रोजी रमजान ईद निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  730   युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर   ·           जागतिक युवक कौशल्य दिन...