Thursday, June 15, 2017

बालकामगार विरोधी दिनानिमित्त
कायेदविषयक शिबीर पन्न
नांदेड, दि. 15  :-  हजरत फातेमा मुलींची माध्यमिक शाळा देगलूरनाका नांदेड येथे जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कायदेविषयक शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे हे अध्यक्षस्थानी होते. अॅड. प्रविण अयाचित, शाळेचे सचिव, अॅड. शेहजान सिद्दीकी, शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती सय्यदा अंजुमआरा, अॅड. नयुम खान पठाण, अॅड. एम.एल.गायकवाड, अॅड. आर.जी.कानोटे, अॅड. तब्बसुम, अॅड. श्रीमती टी.एम.शेख, अॅड. गंगासागरे राणी यांची उपस्थितहोत.
            बालमजुरी कायदची माहिती देताना न्या. वसावे म्हणाले की, बालमजुरी करणाऱ्या मुलांचा मानसिक शारीरि विकास होत नाही. मुलांनी काम करत असलेले काम कशा पध्दतीचे आहे हे कळण्यासाठी त्यांना शिक्षण महत्त्वाचे आहे. बालमजुरांना धोक्याच्या ठिकाणी काम करताना धोका होऊ शकतो याची जाणी नसते, म्हणून त्यांनी शिक्षण शिकले पाहिजे त्यातून त्यांचा मानसिक शारिरीक विकास होतो,  असे सांगीतले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी कायदा तसेच गरिबी निर्मुलनासाठी प्रभावी अंमलबजावणी याबाबतही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात अॅड. अयाचित यांनी शिक्षणाचा अधिकार याबाबत माहिती दिली. अॅड. शेहजान सिद्दीकी यांनी बालमजुरीचे दुष्परीनाम याबाबत माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यदा अंजुमआरा यांनी बालमुजरी रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. अॅड.  गायकवाड यांनी वयाच्या 14 वर्षापर्यंत बालमजुरी करणे हा कायदाने गुन्हा असल्याचे सांगून याबाबत शासनाने बालमजुरी प्रतिबंधात्मक कायदा तयार केला असल्याचे सांगीतले. अॅड. आर. जी. कानोटे यांनी बालमजुरीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देताना शिक्षणास प्राधान्य देण्याचे सांगितले. अॅड. तब्बसुम, अॅड. श्रीमती टी.एम.शेख यांनी मार्गदर्शन केले.
तत्पुर्वी शिबीरास आलेल्या मान्यवरांचे न्यायाधीशांचे स्वागत शाळेतील कर्मचारी, विद्यार्थीनी शाळेचे सचिव अॅड. शेहजान सिद्दीकी यांनी केले. सुत्रसंचालन अॅड. नयुम खान पठाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार शळेच्या उपमुख्याध्यापिका तसलीम फातेमा यांनी केले. या कार्यक्रमास हजरत फातेमा माध्यमिक शाळेतील तीनशे विद्यार्थीनी, आदी उपस्थित होते.
00000000




जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा 
तहसिल कार्यालयात शनिवारी लिलाव
 नांदेड दि. 15नांदेड तालुक्यात जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली शनिवार 17 जून 2017 रोजी दुपारी 12 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
योग दिनानिमित्त विविध
कार्यक्रमाचे आयोजन करावे
 नांदेड दि. 15 - योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आंतराष्ट्रीय योगदिन दिनाचे औचित्य साधून बुधवार 21 जून 2017 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केला असून या दिनाचे औचित्य साधून योगा उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतीक कार्यक्रम आदीचे आयोजन शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एन.एस.एस., नेहरु युवा केंद्र इत्यादी युवा संघटनांमार्फत योगासंबंधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. आंतराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनासंबंधी अन्य माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि. 8 जून 2016 हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

00000
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची
कामे ऑनलाईन पद्धतीने सुरु
नांदेड, दि. 15  :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची कामे ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली आहेत. न्यासाच्या विश्वस्तांना त्यांचे न्यासाचे परिशिष्ट- एकची माहिती www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. अर्जदारांनी त्यांच्या संस्था नोंदणी, न्यास नोंदणी, बदल अर्ज, कलम 41 क अंतर्गत परवाना अर्ज व लेखा परीक्षण अहवाल ऑनलाईन भरावेत, असे आवाहन नांदेड विभागाचे धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने संस्था नोंदणी अर्ज उपाआयुक्त प्रणिता श्रीनीवार व सहायक धर्मादाय आयुक्त मंजुषा अलोने यांच्या हस्ते पहिले नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने नुकतेच देण्यात आले. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी अर्जदारास ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड व पॅनकार्ड आवश्यक आहे. तसेच इतर विश्वस्ताची सुद्धा ही माहिती असणे आवश्यक आहे.

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...