Friday, December 13, 2019


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 16 डिसेंबर 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000


 शिधापत्रिकेसाठी सेतूमार्फत
संचिका सादर करावी - तहसिलदार अरुण जराड
नांदेड, दि. 13 :- शिधापत्रिका काढण्यासाठी सेतूमार्फत संचिका सादर करावी. बाहेरील व्यक्तीकडे शिधापत्रीका काढण्यासाठी देऊ नये. सेतूमार्फत दाखल केलेल्या अर्जांची चौकशी तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अथवा अधिकृत सेतू चालकांकडे करावी. इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये, असे आवाहन नांदेड तहसिलदार अरुण जराड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत नांदेड तहसिल कार्यालयात अती जूने प्रलंबीत असलेल्या संचिका निकाली काढून संबंधित लाभार्थ्यांच्या घरपोच पोस्टाने पत्र पाठवून दयावे अशा सुचना दिल्या. त्यानुसार शिधापत्रीका विभागातील अती जूने प्रलंबीत असलेल्या संचिका निकाली काढून 1 हजार 207 लाभार्थ्यांना घरपोच पोस्टाने पत्र पाठविण्यात आलीत. ज्या लाभार्थ्यांना पत्र मिळाले त्यांनी तहसिल कार्यालयातून शिधापत्रीका नेली. यावेळी शिधापत्रीकाधारकांना घरपोच पत्र दिल्याने लाभार्थ्यांना शिधापत्रीका मिळेल व फसवणूक होत नाही, असे मत शिधापत्रीकाधारकांनी व्यक्त केले. यासाठी नायब तहसिलदार (पुरवठा) सारंग चव्हाण, अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
000000


स्कुलबस धोरणाबाबत
मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 13 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच शिक्षण विभाग महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्कुल बस धोरण-2011 अंतर्गत शालेय विद्यार्थी वाहतुक सुरक्षीतपणे होण्यासाठी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा आज श्री सचखंड गुरु ग्रंथभवन नांदेड येथे आयोजीत करण्यात आली होती.
या कार्यशाळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा. प्रा.परिवहन अधिकारी रोहीत काटकर,  मनपा शिक्षणाधीकारी डी. आर. बनसोडे, प्राचार्य तथा उपप्रबंधक गुरुव्दारा सचखंड बोर्डचे रंजीत सिंग चिरागिया तसेच औद्योगिक  प्रशिक्षण संस्था खालसा स्कुलचे प्राचार्य बच्चनसिंग, मोटार वाहन निरिक्षक श्री चव्हाण, श्री यादव, शाळेचे मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपीक श्री गाजुलवाड, श्री पवळे क.लिपीक काकडे या कार्यशाळेउपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्कुल बस धोरण 2011 अंतर्गत असलेल्या नियमांची मुख्याध्यापकांना माहिती दिली. या नियमावली अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापकाचे कर्तव्य जबाबदाऱ्याची माहिती  दिली. मा. उच्च न्यायालय मुंबई  यांनी जनहित याचिका क्र.97/2011 मधील दि.25-11-2019 च्या आदेशान्वये ऑटोरिक्षा मधुन विद्यार्थ्याची वाहतुक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना ऑटोरिक्षामधून प्रवास करण्यास मनाई करतील याबाबतची न्यायालयाने व्यक्त केलेली अपेक्षेची माहितीही श्री. राऊत यांनी दिली.
शिक्षणाधिकारी श्री बनसोडे  यांनी  नांदेड तालुक्यातील सर्व मुख्याध्यपकांना स्कुल बस धोरण 2011 च्या अनुषंगाने माहिती  दिली काही अडचणी असल्यास त्यांना कळविण्याचे आवाहन केले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काटकर यांनी प्रस्ताविक केले.
00000

पंचायत समिती सभापती पदांच्या
आरक्षित पदांची सोडत संपन्न
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यातील 16 पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत पंचायत समिती निहाय वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील आयोजित बैठकीत पंचायत समिती निहाय सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत आज काढण्यात आली.   
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, तहसिलदार (सामान्य) प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार संजीवनी मुकडे, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.   
महाराष्‍ट्र शासनाने ग्रामविकास यांच्याकडील महाराष्‍ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब अंक 151 (8) बुधवार 27 नोव्हेंबर 2019 अन्‍वये जिल्‍ह्याच्‍या अधिकार क्षेत्रातील पंचायत समीतींमधील सभापती पदाच्‍या विद्यमान आरक्षणाची संपल्‍याच्‍या दिवसानंतर लगतच्‍या दिवसापर्यंत सुरू होणाऱ्या उर्वरीत कालावधीकरीता (दिनांक 21 डिसेंबर 2019 पासुन) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्‍त जाती, भटक्‍या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलांसह) सोबतच्‍या अनुसूचिमध्‍ये दर्शविल्‍याप्रमाणे विनिर्दिष्‍ट केली आहे.
अ.क्रं.
प्रवर्ग
पंचायत समिती संभापती करीता निर्धारीत आरक्षण
पंचायत समिती सभापती करीता निर्धारीत महिला आरक्षण
1
अनुसूचित जाती
03
02
2
अनुसूचित जमाती
02
01
3
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
04
02
4
सर्वसाधारण
07
04

एकुण
16
09
 महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषदा (अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व विषय समित्‍यांचे सभापती) आणि पंचायत समित्‍या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणुक) नियम 1962 च्‍या नियम 2 (फ) च्‍या उपकलम 2(अ), 2(ब), 3(अ), 3(ब), 4(अ), 4(ब), 5(अ), 5(ब) अन्‍वये प्राप्‍त अधिकारानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्‍ह्याचे अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्‍यांकरीता, पंचायत समितींमधील सभापतीच्‍या पदाच्‍या आरक्षणाची मुदत संपल्‍याच्‍या दिनांकानंतर येणाऱ्या लगतच्‍या दिवसापासुन सुरु होणाऱ्या उर्वरीत (दिनांक 21 डिसेंबर, 2019 पासुन) कालावधी करीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्‍त जाती, भटक्‍या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलांसह) सोडतीव्‍दारे सोबतच्‍या अनुसूचीमध्‍ये दर्शविल्‍याप्रमाणे आरक्षण नेमुन दिले आहे.
अ.क्र.
पंचायत समिती नाव
आरक्षण
1
उमरी
अनुसूचित जाती  (महिला)  
2
अर्धापुर
अनुसूचित जाती (महिला)    
3
मुदखेड
अनुसूचित जाती      
4
हदगांव
अनुसूचित जामाती (महिला)  
5
देगलुर
अनुसूचित जमाती
6
धर्माबाद
नागरिकांचा मागास प्रवर्ग  
7
बिलोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग
8
हिमायतनगर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)  
9
माहुर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)  
10
नांदेड
सर्वसाधारण (महिला)  
11
कंधार
सर्वसाधारण (महिला)  
12
भोकर
सर्वसाधारण (महिला)  
13
किनवट
सर्वसाधारण (महिला)  
14
लोहा 
सर्वसाधारण
15
नायगांव खै. 
सर्वसाधारण
16
मुखेड 
सर्वसाधारण
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...