Wednesday, May 19, 2021

 

डोसच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक प्रमाणात

   जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लसीचे वाटप 

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 20 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर कोविशिल्डचे 100 डोस प्रत्येकी देण्यात आले. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको, दशमेश हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल या 11 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय लोहा, मुदखेड, बारड येथे कोविशिल्डचे 80 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सिनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कॉव्हॅक्सिनचे 70 डोस तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 18 मे पर्यंत एकुण 4 लाख 4 हजार 665 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयात 19 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 5 हजार 340 डोस असे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस मिळाले आहेत.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 

612 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 208 व्यक्ती कोरोना बाधित

6 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 443 अहवालापैकी 208 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 135 तर अँटिजेन तपासणीद्वारे 73 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 474 एवढी झाली असून यातील 83 हजार 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 138 रुग्ण उपचार घेत असून 95 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 18 व 19 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 830 एवढी झाली आहे. दिनांक 18 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे भोकर येथील 55 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुखेड तालुक्यातील दापका येथील 68 वर्षाचा पुरुष, दि. 19 मे 2021 रोजी यशोसाई कोविड रुग्णालय येथे कंधार तालुक्यातील कुरुळा येथील 53 वर्षाचा पुरुष, लोटस कोविड रुग्णालय येथे अर्धापूर येथील 55 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे काबरा नगर येथील 95 वर्षाचा पुरुष, भारत नगर नांदेड येथील 49 वर्षाची महिला यांचा यात समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 59,बिलोली 4, हिमायतनगर 5, माहूर 3, उमरी 3, नांदेड ग्रामीण 3, देगलूर 1, कंधार 3, मुदखेड 4, हिंगोली 3, अर्धापूर 3, धर्माबाद 2, किनवट 10, मुखेड 4, परभणी 2, भोकर 7, हदगाव 9, लोहा 4, नायगाव 5, बिदर 1  बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 15, देगलूर 3,माहूर 8, उमरी 6, अर्धापूर 2, धर्माबाद 1, मुदखेड 21, परभणी 1, किनवट 2, मुखेड 3, बिलोली 4, लोहा 1, नायगाव 3 असे एकूण 208 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 612 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 376, मुखेड कोविड रुग्णालय 6, धर्माबाद तालुक्यातंर्गत 2, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20,कंधार तालुक्यांतर्गत 2, मालेगाव टी.सी.यु कोविड रुग्णालय 2,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9,  नायगाव तालुक्यांतर्गत 1, मुदखेड कोविड केअर सेटर 10, माहूर तालुक्यातर्गंत 14, उमरी तालुक्यातर्गंत 4, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 4, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 12, किनवट कोविड रुग्णालय 2, लोहा तालुक्यातर्गंत 13, खाजगी रुग्णालय 95 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 2 हजार 138 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 50, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 3, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 40, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 23, देगलूर कोविड रुग्णालय 8, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, बिलोली कोविड केअर सेंटर 28, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 15, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 7, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, एनआरआय कोविड केअर सेंटर 17, बारड कोविड केअर सेंटर 11, मांडवी कोविड केअर सेंटर 2, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 1, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 202, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 78, खाजगी रुग्णालय 397 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 91, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 4 हजार 369

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 6 हजार 515

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 474

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 104

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 830

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-35

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-238

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 138

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-95

00000

सन 2020 साठी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  राज्यात दरवर्षी शेती पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. सर्व शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी गट/संस्था यांनी या पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठी आपला परीपुर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 30 जुन पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मा.आयुक्त (कृषी ) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

 

पुरस्काराचे नाव देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या व रक्कम पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- एक (राज्यातून एक) पुरस्काराची रक्कम 75 हजार. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 50 हजार. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 8) रक्कम 50 हजार. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 50 हजार. युवा शेतकरी पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 30 हजार. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 30 हजार. उद्यान पंडीत पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8) रक्कम 25 हजार. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकुण 40) रक्कम 11 हजार. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-9 (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण 9) याप्रमाणे पुरस्काराचे स्वरुप राहिल.

 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी नवीन शासन निर्णय क्रमांक कृपु-2020/ प्र.क्र12/4अे, मंत्रालय मुंबई-32, दि.15 फेब्रवारी 2021 अन्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे, असे कृषि विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...