Friday, June 17, 2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 


नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 18 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 2 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 18 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते  शनिवार 2 जुलै 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आहे. एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थींनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोदावरी कृषी सेवा केंद्राच्यावर, नवीन मोंढा, नांदेड किंवा संबंधित तालुका कृषि कार्यालयात उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजूर असून या उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर पिकाखालील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देखील लाभ घेता येईल. या योजनेत वैयक्तिक उद्योजक, मालकी / भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, एनजीओ, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, खाजगी कंपन्या यांना नवीन तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्नप्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी (उदा. गुळ उद्योग, दाळ मिल, इ.) प्रस्ताव सादर करता येतील. तसेच शिक्षणाची कोणतीही अट नसुन 18 वर्षावरील सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल.

 

या योजनेसाठी आधार कार्डपॅन कार्डवीज बिलबँक पासबुकयंत्र सामुग्रीचे कोटेशनइतर परवाने हे आवश्यक कागदपत्रे असल्यास आणावे. या योजने अंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रँडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद 4 लाखापर्यंत अनुदान देय राहीलअसेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये

- मंत्री विजय वडेट्टीवार

पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड 

 

            मुंबईदि. १६ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ - १७, २०१७ - १८२०१८ - १९२०१९ - २०२०२० -२१२०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.

            २०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर२०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ - २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणेसंस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णाजिल्हा परभणी२०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूरसंस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा२०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

            संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.

             पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंतसाहित्यिकसमाज प्रबोधनकारसमाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

******

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...