Friday, June 21, 2024

  वृत्त क्र. 516

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन

नांदेड दि. 21 :- सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत असून सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या समता दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल. या समता दिंडीमध्ये नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.   

00000 

  वृत्त क्र. 515

आरोग्‍य विभागात 10 वा आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 

नांदेड दि. 21 :- योग शास्‍त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, स्‍थुलपणा, थॉयराईड वृध्‍दी, मनोविकार, सांध्‍याचे विकार तसेच सध्‍याच्‍या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्‍यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्‍या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्‍यास व रोग मुक्‍त होण्‍यामध्‍ये मदत मिळते, यासोबतच सकारात्‍मक उर्जा मिळते असे प्रतिपादन   जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. 

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्‍या निर्देशानुसार जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्‍या मार्गदर्शनात जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, आयुर्वेदीक दवाखाने, युनानी दवाखाने, नागरी दवाखाने व उपकेंद्र येथे आज योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. 

आयुष मंत्रालयाने Yoga for Self and Society योग स्‍वयंम और समाज के लिए ही संकल्‍पना आयुष मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी ठेवली आहे. आरोग्‍य विषयक समस्‍या समुदाय स्‍तरावर वाढताना दिसत आहेत. या समस्‍यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी व निरामय आरोग्‍यासाठी आहार-विहारात बदल करण्‍याची गरज आहे. यासाठी योगाचा अंगीकार करणे व तो समुदायस्‍तरावर नेऊन समाजाला आरोग्‍यदायी करणे हे या संकल्‍पनेच्‍या केंद्रस्‍थानी आहे. तरी नागरीकांनी आपल्‍या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले. 

जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालये, ग्रामीण रुग्‍णालये येथेही रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम साजरा करण्‍यात आला व योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळा घेण्‍यात आली होती .जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्‍या मार्गदर्शनात आज 21 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम व प्रात्‍यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी अति.जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.सलमा हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाभाऊ बुट्टे यांनी धन्‍वंतरी पूजन व दिपप्रज्‍वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. जिल्‍हा आयुष अधिकारी डॉ. सत्‍यनारायण मुरमुरे, आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ. जवादुल्‍लाह खान, आयुष कार्यक्रम व्‍यवस्‍थापक डॉ. सुनिल भंडारे व सुभाष खाकरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षक मधूकर भारती  यांनी योग प्रात्‍यक्षिके करुन योग व प्राणायाम बाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन योगासने केली.

00000

 वृत्त क्र. 514

 

नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन

जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग

 

क्रीडा विभागाच्या आयोजनाला विद्यार्थ्याचा प्रतिसाद

 

नांदेड दि. 21 :- ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार २१ जूनला सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे उत्सहात साजरा करण्यात आला.शेकडोच्या संख्येने उपस्थित आबालवृद्ध आणि प्रशिक्षकांच्या निर्देशात झालेल्या योग प्रात्यक्षिकाचा सर्वानी अनुभव घेतला.या मुख्य शासकीय समारोहासोबतच शहर व जिल्हयात ठिकठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 

 

सकाळी 7 वाजता श्री. गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे यासाठी योगाभ्यास करणाऱ्या विविध संस्था व वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी  उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चमूने सुदर आयोजन या ठिकाणी केले होते.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,याच्या उपस्थितीत सकाळी बरोबर 7 ला योग दिनाच्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्व योग आसनाची पूर्तता उपस्थित सर्व आबालरुद्धांनी प्रशिक्षकांसोबत केली.


सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत आज प्रार्थना, चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायाम ध्यान ,शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या. अनेकांनी आज प्रथमच योगाभ्यास केला त्यांनी या कार्यक्रमाचे व त्याच्या आयोजनाचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

 योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी शासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी, खेळाडू व मागदर्शक, स्कॉऊट गाईड, एन.एस.एस., एन.सी.सी., योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

नांदेड शहरासोबतच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, ग्रामपंचायतच्यावतीने गावागावातील  नागरिकांनी  योग दिनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते..

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केल्याची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यासाठी सविस्तर माहिती www.ayushdsonanded.dsys-mh@gov.in,dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर फोटोसह कार्यक्रम आयोजनाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  केले आहे.

 

केंद्र शासनाने 21 जून 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले असून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो.

 

आजच्या आयोजनात  जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, ने.यु.कें. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर, जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे, संजय बेतीवार क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंडेकर, शिवकांता देशमुख, क्रीडा मार्गदर्शक,बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, टी. एन. रामनबैनवाड नांदेड जिल्हा योग संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर गजानन हुगे (प्रतिनिधी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन,नांदेड), आर. डी. केंद्रे (योग विद्या धाम), सुरेश येवतीकर (योग विद्या धाम), प्रलोभ कुलकर्णी (क्रीडा भारती),गंगाबिशन कांकर (गिता परिवार),किशन रंगराव भवर (प्रतिनिधी, क्रीडा भारती), राम शिवपनोर (भारत स्वाभिमान न्यास, पतंजली), सुरेश लंगडापुरे (पतंजली योग समिती), नागोराव पोटबदवार (सचिव योग विद्याधाम नांदेड), डॉ. अवधूत पवार (इंटरनॅशनल नॅपरोपॅथी ऑर्गनायझेशन,नांदेड), बालाजी लंगडापुरे (आय.एन.ओ. जिल्हा संघटक नांदेड), एस.गंगाधर पाटील (आय.एन.ओ. सचिव, नांदेड), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हींग), शिवाजीराजे पाटील (आर्ट ऑफ लिव्हींग) आदींची उल्लेखनीय उपस्थिती होती. 

00000














गुरूग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे आज 21 जूनला 10 आंतरराष्ट्रीय योग दिवस, केंद्रीय आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शाळकरी विद्यार्थी, विविध योगाभ्यासी मंडळे व संस्थांची सदस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयमार्फत हे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफित.



 गुरूग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे आज 21 जूनला 10 आंतरराष्ट्रीय योग दिवस, केंद्रीय आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शाळकरी विद्यार्थी, विविध योगाभ्यासी मंडळे व संस्थांची सदस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयमार्फत हे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफित.



 


गुरूग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे आज 21 जूनला 10 आंतरराष्ट्रीय योग दिवस, केंद्रीय आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शाळकरी विद्यार्थी, विविध योगाभ्यासी मंडळे व संस्थांची सदस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयमार्फत हे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफित.

वृत्त क्र. 513

पंजाबच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री

गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान यांचा दौरा

नांदेड दि. 21 :- पंजाब राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री गगनदीप कौर उर्फ अनमोल गगन मान या २५ जून २०२४ रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

मंगळवार 25 जून 2024 रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 8.45 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. दुपारी 4.30 वाजता नांदेड येथून हैद्राबादकडे विमानाने प्रयाण करतील.

00000

वृत्त क्र. 512

महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 21 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

शुक्रवार 21 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे रात्री 11 वाजता आगमन. रात्री 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन,  राखीव व मुक्काम.

००००

 वृत्त क्र. 511

सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

नांदेड दि. 21 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्यावतीने सोमवार 24 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आर्य वैश्य मंगल कार्यालय, मुखेड येथे आयोजित केला असून या मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यास आमदार राम पाटील रातोळीकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक पी.टी. देवतळे, तहसिलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी रामोड, मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. किशोर कदम यांची उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यास तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यासाठी मुखेड तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने क्यआर कोड स्कॅन करुन आपली नोंदणी करावी. तसेच https://mahacareer.globalsapio.com/ या गुगल फार्म लिंकवर नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर व प्राचार्य जी.जी. पाटनुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड जि. नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...