Friday, June 21, 2024

 वृत्त क्र. 514

 

नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन

जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग

 

क्रीडा विभागाच्या आयोजनाला विद्यार्थ्याचा प्रतिसाद

 

नांदेड दि. 21 :- ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार २१ जूनला सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे उत्सहात साजरा करण्यात आला.शेकडोच्या संख्येने उपस्थित आबालवृद्ध आणि प्रशिक्षकांच्या निर्देशात झालेल्या योग प्रात्यक्षिकाचा सर्वानी अनुभव घेतला.या मुख्य शासकीय समारोहासोबतच शहर व जिल्हयात ठिकठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 

 

सकाळी 7 वाजता श्री. गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे यासाठी योगाभ्यास करणाऱ्या विविध संस्था व वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी  उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चमूने सुदर आयोजन या ठिकाणी केले होते.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,याच्या उपस्थितीत सकाळी बरोबर 7 ला योग दिनाच्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्व योग आसनाची पूर्तता उपस्थित सर्व आबालरुद्धांनी प्रशिक्षकांसोबत केली.


सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत आज प्रार्थना, चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायाम ध्यान ,शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या. अनेकांनी आज प्रथमच योगाभ्यास केला त्यांनी या कार्यक्रमाचे व त्याच्या आयोजनाचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

 योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी शासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी, खेळाडू व मागदर्शक, स्कॉऊट गाईड, एन.एस.एस., एन.सी.सी., योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

नांदेड शहरासोबतच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, ग्रामपंचायतच्यावतीने गावागावातील  नागरिकांनी  योग दिनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते..

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केल्याची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यासाठी सविस्तर माहिती www.ayushdsonanded.dsys-mh@gov.in,dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर फोटोसह कार्यक्रम आयोजनाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  केले आहे.

 

केंद्र शासनाने 21 जून 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले असून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो.

 

आजच्या आयोजनात  जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, ने.यु.कें. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर, जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे, संजय बेतीवार क्रीडा अधिकारी, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंडेकर, शिवकांता देशमुख, क्रीडा मार्गदर्शक,बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, टी. एन. रामनबैनवाड नांदेड जिल्हा योग संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर गजानन हुगे (प्रतिनिधी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन,नांदेड), आर. डी. केंद्रे (योग विद्या धाम), सुरेश येवतीकर (योग विद्या धाम), प्रलोभ कुलकर्णी (क्रीडा भारती),गंगाबिशन कांकर (गिता परिवार),किशन रंगराव भवर (प्रतिनिधी, क्रीडा भारती), राम शिवपनोर (भारत स्वाभिमान न्यास, पतंजली), सुरेश लंगडापुरे (पतंजली योग समिती), नागोराव पोटबदवार (सचिव योग विद्याधाम नांदेड), डॉ. अवधूत पवार (इंटरनॅशनल नॅपरोपॅथी ऑर्गनायझेशन,नांदेड), बालाजी लंगडापुरे (आय.एन.ओ. जिल्हा संघटक नांदेड), एस.गंगाधर पाटील (आय.एन.ओ. सचिव, नांदेड), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हींग), शिवाजीराजे पाटील (आर्ट ऑफ लिव्हींग) आदींची उल्लेखनीय उपस्थिती होती. 

00000














No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...